मकाईगेटची भिंत पाडून बांधकाम; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:50 IST2019-04-18T23:50:06+5:302019-04-18T23:50:41+5:30

मकाईगेटची ऐतिहासिक भिंत तोडून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच मालमत्ताधारकांविरोधात आज बेगमपुरा पोलीस ठाण्यात मनपातर्फे गुन्हा नोंदविण्यात आला.

Construction by breaking down the wall of McGeegot; Filed the complaint | मकाईगेटची भिंत पाडून बांधकाम; गुन्हा दाखल

मकाईगेटची भिंत पाडून बांधकाम; गुन्हा दाखल



औैरंगाबाद : मकाईगेटची ऐतिहासिक भिंत तोडून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच मालमत्ताधारकांविरोधात आज बेगमपुरा पोलीस ठाण्यात मनपातर्फे गुन्हा नोंदविण्यात आला.
मकाईगेटची संरक्षक भिंत तोडून कॉलम उभारण्यात आले. या अनधिकृत बांधकामधारकांना मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने वेळोवेळी तोंडी, लेखी सूचना दिल्या. त्यानंतरही बांधकाम थांबविण्यात आले नाही. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार बांधकामधारक शेख अहेमद शेख उस्मान, शेख नूर शेख उस्मान, शेख आमीर शेख उस्मान, शेख आसिफ शेख नूर, शेख अजीज शेख इस्माईल यांच्याविरोधात नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५४ अन्वये व शासकीय मालमत्ता विद्रुपीकरण कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांनी हा गुन्हा दाखल केला.
------------

Web Title: Construction by breaking down the wall of McGeegot; Filed the complaint