शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघनिहाय भरारी पथके

By admin | Updated: September 14, 2014 00:22 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची तयारी म्हणून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व निर्वाचन अधिकारी व सहायक निर्वाचन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपशीलवार मार्गदर्शन केले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची तयारी म्हणून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व निर्वाचन अधिकारी व सहायक निर्वाचन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपशीलवार मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी (सामान्य) देवेंद्र कटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व निर्वाचन अधिकारी यांचे कार्यालय गुरुवारपर्यंत आवश्यक त्या कर्मचारी वर्ग व साहित्यासह सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आचारसंहिता लागू झाली असल्याने आतापासून व्हिडिओग्राफी पथके तैनात केली जावीत, प्रत्येक विधानसभेला सध्या ४ पथके ठेवावीत. आचारसंहितेचे उल्लंघन व मतदारांना रकमेचे वाटप लक्षात घेऊन भरारी पथके नेमावीत. उमेदवारांचे अर्ज स्वत: निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्वीकारावेत, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो रजिस्टर ठेवावे, प्रमुख उमेदवारांच्या हालचाली टिपण्यासाठी सकाळी ६ ते रात्री निवासी जाईपर्यंत व्हिडिओग्राफी करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी यावेळी दिल्या. उमेदवारांनी मागितलेल्या प्रचार सभेच्या स्थळाची परवानगी, लाऊड स्पीकर परवानगी, छपाई परवानगी, प्रसिद्धीसाठी अनुमती इत्यादी निवडणूकविषयक बाबी वेळेत पूर्ण कराव्यात, असेही जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले तर तेथे मतदार जनजागृती कार्यक्रम व्यापकरीत्या राबवावा. यामध्ये लोकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.आचारसंहिता लागू तरीही १७ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणीआचारसंहिता लागू झाली असली तरी मतदारांची नावनोंदणी सुरूच असणार आहे. तहसील कार्यालयातील मदत केंद्रात १७ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवीन मतदारांची नोंदणी करता येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट पेपर्स पुरविण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या.