शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

अंबडला पाण्यासाठी काँग्रेसने काढला मोर्चा

By admin | Updated: November 4, 2014 01:36 IST

अंबड : शहरास विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे तसेच स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

अंबड : शहरास विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे तसेच स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शहरात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पंधरा दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठाही अत्यंत दूषित असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना रुग्णालयात उपचारांसाठी हजारों रुपयांचा नाहक भुर्दंड भोगावा लागत आहे. यावर नगरपालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने यापूर्वीही वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मोर्चामध्ये नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते केदार कुलकर्णी, न.प.सदस्य जाकेर डावरगांवकर, प्रकाश नारायणकर, खुर्शिद जिलाणी, जगन खरात, नारायण कटारे, सोमनाथ उदावंत यांच्यासह रवि डोंगरे, संभाजी गुडे, युनुस तांबोळी, राजेंद्र मोरे, दामोधर गायकवाड, अशोक खरात, शेख युनुस, जुनेद डावरगांवकर, मुरलीधर नारायणकर, शेख हाफीज, गाजी, शेख असलम, धर्मराज बाबर, बाबाराजा शिंदे, मुस्तीकीन तांबोळी, प्रविण दुधाधारी, मुकिम पठाण, शेख जावेद, अब्दुल समद, शेख मजहर, शेख खादिर, शेख सलीम आदींसह मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कँडल मार्चचे आयोजन योगेश मेखले व गणेश खरात यांनी केले होते. (वार्ताहर)