दोन मालमत्तांवर जप्ती
By Admin | Updated: February 8, 2015 00:10 IST2015-02-07T23:58:51+5:302015-02-08T00:10:00+5:30
जालना : जुना जालन्यातील कांचननगर भागात गेल्या दहा वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या दोन मालमत्ताधारकांच्या मालमत्तांची

दोन मालमत्तांवर जप्ती
जालना : जुना जालन्यातील कांचननगर भागात गेल्या दहा वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या दोन मालमत्ताधारकांच्या मालमत्तांची नगरपालिकेच्या वतीने शनिवारी जप्ती करण्यात आली. या दोन्ही मालमत्तांना सील लावण्यात आले आहे.
या भागातील बाबासाहेब रंगनाथ शेळके यांच्याकडे १५ हजार १९० रुपये तर बाबासाहेब रामराव आचरे यांच्याकडे ६२ हजार ९४४ रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ही जप्तीची कारवाई पालिकेच्या पथकामार्फत करण्यात आली. नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलमखान, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख हरिश्चंद्र आंधळे, सुरेश गंगासागरे, विनोद कुरील, आनंद हजारे, फेरोज बेग, अमजद खान, आकाश गिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.