संगणक परिचालक ‘सलाईनवर’
By Admin | Updated: January 5, 2016 00:19 IST2016-01-05T00:01:18+5:302016-01-05T00:19:26+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या संग्राम सेतू सुविधा केंद्रामध्ये आॅनलाईन प्रमाणपत्रांचे वितरण व संगणकीय कामकाजासाठी परिचालक पुरवठा करण्याचा

संगणक परिचालक ‘सलाईनवर’
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या संग्राम सेतू सुविधा केंद्रामध्ये आॅनलाईन प्रमाणपत्रांचे वितरण व संगणकीय कामकाजासाठी परिचालक पुरवठा करण्याचा महाआॅनलाईन कंपनीचा करार ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात आला. परिणामी जिल्ह्यातील ८०० ते ८२५ संगणक परिचालकांची सेवादेखील आपोआप संपुष्टात आली. मात्र, ७ जानेवारीपर्यंत शक्य असेल तर आपली सेवा सुरू ठेवण्याचा तोंडी सल्ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी संगणक परिचालकांना दिला आहे.
यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, संगणक परिचालकांच्या सेवा सुरू ठेवण्याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नाहीत. मात्र, ७ जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये यासंबंधी मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संग्राम सेतू सुविधा केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना