शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

ST Strike : मराठवाड्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:59 PM

विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद, नांदेड या आगारात नियमित बस फेऱ्या सुरु आहेत.तर कन्नड, गेवराई, हिंगोली, पाटोदा, परळी आदी आगारात कर्मचारी संपात सहभागी आहेत. 

राज्य परिवहन विभागाने कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ फसवी आहे. केवळ आकडेमोड करून कर्मचाऱ्यांना वाढ देत असल्याने प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना विशेष फायदा होत नसल्याचा आरोप कामगार संघटनेने करून काम बंद आंदोलन पुकारले आहे. मध्यरात्रीपासूनच अनेक आगारात संपाचा परिणाम दिसून आला. मराठवाड्यात औरंगाबाद व नांदेड आगारात बससेवा सुरळीत असून आतापर्यंतच्या सर्व गाड्या रवाना झाल्या असल्याची माहिती आगारातून मिळाली आहे. तर भोकर येथे दोन बसवर दगडफेकीची घटना वगळता संप शांततेत सुरु आहे. 

हिंगोली :बसचालक वाहक संपात सहभागी झाल्याने सकाळपासून बससेवा बंद. काही चालक वाहकांच्या इच्छेनुसार बस सोडण्यात आल्या. बससेवा बंदमुळे प्रवासी स्थानकात ताटकळले.

उमरी :

भोकर - उमरी - नरसी बस सेवा चालू आहे . सकाळपासून नरसीला ३ गाड्या प्रवासी घेऊन उमरी मार्गे गेल्या व परत भोकरला पण गेल्या. एसटी कर्मचा-यांच्या संपाचा परिणाम नाही.

कन्नड :

बस आगारातुन सकाळपासुन आतापर्यंत ७ बस प्रवाशी घेऊन बाहेर पडल्या.बहुतांशी कर्मचारी,वाहक -चालक संपात सहभागी झाले आहेत

परळी : संपूर्ण बस वाहतूक ठप्प असून प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्व कर्मचारी आगाराच्या प्रवेशद्वारावर बसून आहेत. 

पाटोदा : महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारल्याने येथील बस अगाराचा कारभार विस्कळित झाला. शिव सेना संबंधित संघटनेचे केवळ चार कर्मचारी कर्तव्यावर आहेत. दोन बस ग्रामीण भागासाठी स्थानकाबाहेर गेल्याचे आगारप्रमुख एस बी पडवळ यांनी सांगितले .

गेवराई  :संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले असुन अनेक प्रवासी आगारात  ताटकळत बसले आहेत. आगारात बसेसच्या रांगा लागल्या आहेत

खाजगी वाहतुकीचे तिकीट दर वाढले संपामुळे अनेक प्रवाश्यांनी खाजगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला. मात्र खाजगी प्रवासी वाहकांनी तिकीट दर दुप्पट केले आहेत. वाहतुक करणा-या रिक्षा, जीप यांनी गेवराई ते बीड 40 रूपये असताना आज मात्र 100 रूपये घेत होते तर औरंगाबाद चे भाडे 100 येवजी 200 आकारले जात आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportएसटीpassengerप्रवासीState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा