शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१५ जुलैपूर्वी उद्दिष्ट पूर्ण करा

By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ७९७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटपांचे उद्दिष्ट असून, १५ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ७९७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटपांचे उद्दिष्ट असून, १५ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीतून दिले. जिल्ह्यातील पीक कर्जाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बँकांचे व्यवस्थापन, अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक, बँक आॅफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक राजकिरण भोईर, जिल्हा उपनिबंधक डॉ.अशोक खरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घटगे, जि.प.चे कृषी अधिकारी गंजेवार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक पी.जी. भागवतकर, अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक यू. आर. होळकर, जि.म. स. बँकेचे नलावडे उपस्थित होते.जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख खातेदार शेतकरी आहेत. परंतु एक लाख ८४ खातेदारांनाच पीक कर्जाचे वाटप केले जाते. दरवर्षी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळते, परंतु, नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक केली जाते. नव्याने पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा निबंधक कार्यालयाने तयार करून बँकाकडे द्याव्यात, जेणे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देता येईल, अशा सूचना केल्या. १ जुलै २०१४ नंतर प्रामुख्याने जिल्ह्यातील २५ टक्के खातेदारांना नव्याने कर्ज द्यावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.आजपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी यावर्षीचे सुमारे ५० टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केले आहे. परंतु कर्ज वाटपाचा वेग वाढला पाहिजे. बँकांनी पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करावे, असेही टोपे यांनी नमूद केले.जिल्ह्याच्या पत आराखड्यात पीक कर्जासोबतच इतर कर्जाचे उद्दिष्टही निश्चित करण्यात येते. मात्र यातील कृषीपूरक साधने, अवजारे, विहीर, पाइपलाईन, ट्रॅक्टर आदीसाठी मात्र फारच कमी कर्जपुरवठा केला जातो. यासाठी कर्जाचा पुरवठा करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. बँकांनी या आवाहनास प्रतिसाद देत कर्ज देण्याचे मान्य केले.यावर्षी पीक कर्जाचे उद्दिष्ट २४ टक्क्यांनी वाढवून ७९७ कोटी रूपयांचे करण्यात आले आहे. गतवर्षी पीक कर्जवाटपात विभागातून प्रथम क्रमांक पटकावला होता. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच एकूण ८०० कोटी ६५ लाख रूपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात होते. यात खरिपासाठी ६२४ कोटी ५१ लाख तर रबीसाठी १७६ कोटी १४ लाख रूपयांचे पीक वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)शेतकरी, ग्राहकांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचनाबँकांमध्ये शेतकरी आणि नागरिकांना अतिशय वाईट वागणूक मिळत आहे, अशी खंत व्यक्त करून पालकमंत्री टोपे यांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वर्तनात, वागणुकीत बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले. बँकेत येणाऱ्या ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, त्यांना विना व्यत्यय सेवा देण्यात यावी, त्याकरिता बँकांनी लोकाभिमुख होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.बँकांच्या कामासाठी दलालाला पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांसाठी पैसे मोजावे लागतात, या गोष्टी त्वरीत थांबविण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.