शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांची नगररचना विभागात झाडाझडती

By admin | Updated: September 16, 2014 01:36 IST

औरंगाबाद : मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी आज नगररचना विभागात तब्बल पाऊणतास संचिकांची झाडाझडती घेतली. त्यांनी इमारत क्रं.३ मध्ये दीडतास पाहणी करून

औरंगाबाद : मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी आज नगररचना विभागात तब्बल पाऊणतास संचिकांची झाडाझडती घेतली. त्यांनी इमारत क्रं.३ मध्ये दीडतास पाहणी करून कर्मचाऱ्यांची व विभागाची ओळख परेड घेतली, तसेच इमारतीच्या छतावरून पाठीमागील नाल्याची पाहणी केली.नगररचना विभागात आयुक्तांनी उपअभियंता शिरीष रामटेके यांच्याकडून बांधकाम परवानग्या, टीडीआरची माहिती घेतली. सहायक संचालक नगररचना डी.पी. कुलकर्णी आज पालिकेत नव्हते. त्यांच्या गैरहजेरीत आयुक्तांनी विभागाची झाडाझडती का केली. यावरून पालिकेत तर्कवितर्क लढविले जात होते. शहर अभियंता एस.डी. पानझडे, उपअभियंता अफसर सिद्दीकी आदींची उपस्थिती होती. पालिकेत फेबु्रवारीमध्ये टीडीआर प्रकरणातून मोठा गदारोळ झाला होता. पेठेनगरमधील त्या टीडीआरमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोळ झाल्याचे आरोप प्रशासनावर झाले होते. तत्कालीन आयुक्त डॉ.कांबळे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून टीडीआर थांबविला. त्यानंतर भोगवटा आणि गुंठेवारी विभागातील प्रकरणातूनही नगररचना विभाग संशयाच्या भोवऱ्यात आला. नगररचना विभागात सध्या दरमहा २ ते ३ बांधकाम संचिका मंजूर होत आहेत. पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात हा विभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे विभागातून जास्तीचे उत्पन्न मिळण्यासाठी आयुक्त प्रयत्न करीत आहेत. त्या अनुषंगाने आयुक्तांनी नगररचना विभागातील संचिका पाहिल्या. त्यानंतर प्रशासकीय विभागातील खुर्च्या बदलण्याचे त्यांनी आदेश दिले. कर आकारणीसाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. पालिकेत कर आकारणी वर्षानुवर्ष मुख्यालयात होते. असे शहर अभियंत्यांनी आयुक्तांना सांगितले. त्यानंतर त्यांनी इमारत क्र.३ वरून टाऊन हॉल व पाठीमागील नाल्याची पाहणी केली. सहायक आयुक्त रोशन मकवाने यांनी काही कार्यालयीन साहित्याची त्यांच्याकडे मागणी केली. प्रभाग अ मध्ये समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराने थाटलेल्या वसुली कार्यालयाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रशासकीय कामकाजाची इमारतीत पाहणी बऱ्याच वर्षांनंतर झाली आहे. आयुक्त महाजन यांनी पाहणी केल्यामुळे तत्कालीन आयुक्त सतीश त्रिपाठी, मुन्शीलाल गौतम यांची आठवण काही जुन्या कर्मचाऱ्यांना झाली. ४आयुक्तांनी इमारत क्र.३ मध्ये ओळख परेड घेतल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. विभागात अनेक कर्मचारी आलेले नव्हते, तर काही जण बाहेर गेलेले होते. आयुक्तांनी अचानक पाहणी करून विभागात कोण काय करते, याचा आढावा घेतला.