व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प; दौलताबाद-वेरूळ महामार्गावरील हॉटेल चालकांनी मांडली चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:40 IST2026-03-13T18:40:07+5:302026-03-13T18:40:50+5:30

व्यावसायिक सिलिंडर बंद झाल्याने ढाबा चालकांसमोर चुलीचा पर्याय

Commercial Gas Shortage in Chhatrapati Sambhajinagar: Hotels in Ellora-Khuldabad Switch to Traditional Chulhas | व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प; दौलताबाद-वेरूळ महामार्गावरील हॉटेल चालकांनी मांडली चूल

व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प; दौलताबाद-वेरूळ महामार्गावरील हॉटेल चालकांनी मांडली चूल

खुलताबाद: व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने दौलताबाद, खुलताबाद आणि वेरूळ परिसरातील हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी अनेक हॉटेल आणि ढाबा चालकांनी पुन्हा पारंपरिक चुलींचा आधार घेतला आहे. यामुळे या भागात येणाऱ्या पर्यटकांना आता चक्क चुलीवर बनवलेल्या जेवणाचा अस्सल ग्रामीण स्वाद चाखायला मिळत आहे.

पर्यटकांची चुलीवरील जेवणाला पसंती
दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदिर आणि भद्रा मारुती येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. गॅसअभावी काही हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर असताना, अनेक चालकांनी लाकूड आणि सरपणावर स्वयंपाक सुरू केला आहे. चुलीवर बनवलेली भाजी-भाकरी आणि वरण-भात पर्यटकांना अधिक चविष्ट वाटत असल्याने, या हॉटेल्समध्ये गर्दी वाढू लागली आहे.

चालकांची हतबलता आणि संधी
"व्यावसायिक सिलिंडर बाजारात मिळतच नसल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. नाईलाजास्तव आम्ही जुन्या पद्धतीने चुली मांडल्या आहेत. मात्र, यामुळे पर्यटक आकर्षित होत असल्याचे समाधान आहे," असे एका ढाब्याचे संचालक संदीप शेळके यांनी सांगितले. एकूणच, गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असला तरी, 'चुलीवरील जेवण' ही या भागातील पर्यटनाची नवी ओळक बनू लागली आहे.

Web Title : गैस की कमी से होटल मालिक पारंपरिक चूल्हे इस्तेमाल करने को मजबूर।

Web Summary : दौलताबाद, खुलताबाद और वेरुल में व्यावसायिक गैस आपूर्ति बाधित होने से होटल पारंपरिक चूल्हे का उपयोग करने को मजबूर। पर्यटक अब प्रामाणिक ग्रामीण भोजन का आनंद ले रहे हैं, जिससे कुछ के लिए व्यवसाय बढ़ रहा है।

Web Title : Gas shortage forces hotel owners to use traditional stoves.

Web Summary : Commercial gas supply disruptions in Daulatabad, Khultabad, and Verul force hotels to use traditional stoves. Tourists now enjoy authentic rural cuisine, boosting business for some.