‘भूमिअभिलेख’मध्ये दलालांचा सुळसुळाट

By Admin | Updated: July 24, 2015 00:49 IST2015-07-24T00:17:25+5:302015-07-24T00:49:37+5:30

बीड : येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून, कार्यालयाबाहेरील खासगी व्यक्ती अर्थात दलाल कारभार हाकत असल्याचा आरोप

The collection of brokers in 'Land Records' | ‘भूमिअभिलेख’मध्ये दलालांचा सुळसुळाट

‘भूमिअभिलेख’मध्ये दलालांचा सुळसुळाट


बीड : येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून, कार्यालयाबाहेरील खासगी व्यक्ती अर्थात दलाल कारभार हाकत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष शरद चव्हाण यांनी केला आहे.
बीड तालुक्याच्या हद्दीतील येणाऱ्या शेतजमिनी व शहरवासियांच्या घराच्या जागेची तसेच सार्वजनिक जागेची मालकी हक्क दर्शविणारे मूळ दस्तऐवज उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात आहेत. कार्यालयाबाहेरील काही व्यक्ती कार्यालयात येऊन क्लार्कच्या खुर्चीवर येऊन बसतात. विशेष म्हणजे हा प्रकार अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर कायम असतो. हा दलाल खुर्चीवर बसून चक्क मूळ दस्तऐवज हाताळतो. स्वत: दाखल केलेल्या प्रकरणाचे फेर रजिस्टरला स्वत:च्या हस्ताक्षरात फेर ओढतो. अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The collection of brokers in 'Land Records'