कारवर पेटते झाड कोसळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:56 IST2019-01-30T00:56:32+5:302019-01-30T00:56:44+5:30

रस्त्याच्या कडेला जळत असलेला वडाचा वृक्ष कारवर कोसळून एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-वैजापूर महामार्गावरील किन्हळ फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती.

 The collapsed tree on the car collapsed one killed | कारवर पेटते झाड कोसळून एक ठार

कारवर पेटते झाड कोसळून एक ठार

लासूर स्टेशन : रस्त्याच्या कडेला जळत असलेला वडाचा वृक्ष कारवर कोसळून एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-वैजापूर महामार्गावरील किन्हळ फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती.
मारुती लक्ष्मण कसारे (६२ रा. मिसरवाडी ) असे मयताचे नाव आहे. इतर गंभीर जखमींमध्ये अनिता खंडागळे, रवी कसारे, सुनिता खरात, नानुबाई कसारे, बाळू खंडागळे व एक चार वर्षाचा बालक यांचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, वैजापूरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारमधून (क्र. एमएच- ०४ डीबी- ९८८३) सात जण प्रवास करीत होते. मात्र, किन्हळ फाट्याजवळ जळत असलेला वडाचा वृक्ष कोसळला. त्यात मारुती हे गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
जखमींना पोलीस पाटील हेमंत पठारे, माजी सरपंच तुकाराम पवार व ग्रामस्थांनी मदत केली.
या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून मयताच्या नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला. सिल्लेगाव ठाण्याचे पोनि.बालक कोळी, अप्पासाहेब काळे, विनोद बिघोत, सुनील दांडगे, विठ्ठल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title:  The collapsed tree on the car collapsed one killed