शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या ६ तर आघाडीच्या ताब्यात २ पंचायत समित्या

By admin | Updated: September 15, 2014 00:02 IST

जालना : जिल्ह्यात आठ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने सरशी मारली.

जालना : जिल्ह्यात आठ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने सरशी मारली. शिवसेना व भाजपाच्या वाट्याला प्रत्येकी तीन सभापती पदे तर दोन्हींना अनुक्रमे दोन उपसभापती पदे मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन ठिकाणांवर सभापती तर एका ठिकाणी उपसभापती पद मिळविले. काँग्रेसला दोन ठिकाणी उपसभापती पदावरच समाधान मानावे लागले. तर एका ठिकाणचे उपसभापतीपद रिक्त ठेवण्यात आले आहे.जालना पंचायत समिती काँग्रेस आघाडीच्या ताब्यातून हिसकावून घेण्यात सेना-भाजपाला यश आले आहे. मनसेचे सदस्य अनिल उफाड यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने युतीचे संख्याबळ ९ झाले. एकूण १६ सदस्य असलेल्या या पंचायत समितीमध्ये बहुमत मिळाल्याने सभापती पदी सेनेच्या द्रौपदाबाई मुरलीधर थेटे तर उपसभापती पदी भाजपाचे गणेश नरवडे यांची निवड झाली.परतूर पंचायत समितीच्या निकालाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण भाजपाचे तुकाराम बोनगे हे राकाँचे कपिल आकात यांच्या गटात गेल्याने निकाल आकात यांच्या बाजूने लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र बोनगे ऐनवेळी स्वगृही परतल्याने निकाल भाजपाच्या बाजूने लागला. सभापती पदी पुन्हा भाजपाच्या छाया माने यांनी तर उपसभापती पदी बोनगे यांची निवड झाली.मंठा सभापतीपदी शिवसेनेच्या उर्मिलाताई सरोदे तर उपसभापतीपदी काँग्रेसचे संतोष पवार यांची निवड झाली.मंठ्यात राकाँ-काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत म्हणजे सात सदस्य असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी राजकीय खेळी केल्याने काँग्रेसचे दोन सदस्य शिवसेनेच्या गोटात आले. भोकरदन पंचायत समितीमध्ये भाजपा-सेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतीपदी भाजपाच्या संगीता लोखंडे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे नवनाथ दौड यांची निवड झाली.घनसावंगी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे बहुमत आहे. त्यामुळे सभापती पदी शिवसेनेचे प्रेमसिंग खेमा राठोड तर उपसभापती पदी डॉ.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली.बदनापूर पं.स.च्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे अदनान हमीदोदीन व उपसभापतीपदी काँग्रेसचे संजय जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जाफराबाद पंचायत समितीमध्ये सभापतीपदी रमाबाई चंद्रकांत चौतमल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापती पदाकरीता शिवसेना सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने अखेर उपसभापतीपद रिक्त ठेवण्यात आले. अंबडच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गावडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे मदनराव जायभाये व शिवसेनेचे दिनेश काकडे यांच्यात लढत होऊन ११ विरुद्ध ५ मतांनी जायभाये विजयी झाले. या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. (प्रतिनिधी)