वडवणी : तालुक्यातील हिवरगव्हाण येथे ३२ वर्षीय महिलेवर शनिवारी शेतात अमानुष मारहाण करून बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याचे तीव्र पडसाद रविवारी उमटले. आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी येथे दिवाळी सणाची लगबग असतानाही व्यापाऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने बंद पुकारला. शिवाय नागरिकांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी यांनी एकत्रित येऊन शहरातील आंबेडकर चौकापासून शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. नायब तहसीलदार एस. डी. चराटे यांना निवेदन दिले. (वार्ताहर)
वडवणीमध्ये बंद, मोर्चा
By admin | Updated: November 8, 2015 23:40 IST