पालिकेत लिपिकच बनले कारभारी

By Admin | Updated: November 30, 2015 23:32 IST2015-11-30T23:06:44+5:302015-11-30T23:32:45+5:30

बीड : येथील नगर पालीकेत आता सर्वसामान्य नागरिकांना उद्धट वागणूक मिळू लागली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागात तर लिपीकच कारभारी बनले असून आलेल्या नागरीकांना उद्धट

The clerk became the clerk in the municipality | पालिकेत लिपिकच बनले कारभारी

पालिकेत लिपिकच बनले कारभारी


बीड : येथील नगर पालीकेत आता सर्वसामान्य नागरिकांना उद्धट वागणूक मिळू लागली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागात तर लिपीकच कारभारी बनले असून आलेल्या नागरीकांना उद्धट वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. अधिकारी साईडवर गेल्यावर लिपीक कार्यालयात कारभारी बनतात व माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अरोप केला जात आहे.
शहरातील रस्ते, नाल्या आदी विकास कामे जास्तीत जास्त हे नगर पालीकेच्या बांधकाम विभागांतर्गत होतात. परंतु मागील काही दिवसांपासून येथील बांधकाम विभाग हा विकास कामे गतीने व चांगल्या दर्जाचे करण्यास उदासिन दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नगर पालीकेबद्दल रोष आहे. याला जबाबदार फक्त येथील अधिकारी आहेत. कारण एखादी सर्वसामान्य व्यक्ती अभियंता यांच्याशी बातचीत करायची आहे, ते कोठे गेले आहेत, असे विचारल्यावर आम्ही काय नोकर आहोत का, असे सांगुन उद्धट वागणूक दिली जात आहे. बांधकाम विभागातील या ‘भांडवला’वर वरीष्ठांचा वचक नसल्याचे यावरून दिसते. कर्मचारी जर उद्धट वागणूक देत असतील तर हे वाईट आहे. याची चौकशी करून कारवाई करू, असे अभियंता प्रदीप गेंदले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The clerk became the clerk in the municipality