शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील उद्योगांचा ‘कणा’ मोडतोय!

By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST

औरंगाबाद : गुणवत्ता, चिकाटी आणि आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर औरंगाबादेतील उद्योगांनी जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले; मात्र मागील काही वर्षांपासून उद्योजक वेगवेगळ्या करांमुळे त्रस्त झाले आहेत.

औरंगाबाद : गुणवत्ता, चिकाटी आणि आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर औरंगाबादेतील उद्योगांनी जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले; मात्र मागील काही वर्षांपासून उद्योजक वेगवेगळ्या करांमुळे त्रस्त झाले आहेत. स्पर्धेच्या युगात उद्योगाकडे बघावे, का कर भरण्यात वेळ वाया घालवावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. करांच्या ओझ्यापासून उद्योजकांची मुक्तता करावी आणि एक खिडकी योजना राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.शहरातील वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रातील लहान-मोठ्या उद्योजकांकडे शासकीय यंत्रणेचा पाहण्याचा दृष्टिकोनही निराळा आहे. उद्योजकांना ‘दान’व समजण्यात येत आहे. एमआयडीसी उद्योजकांकडून सेवाशुल्क घेते, तर ग्रामपंचायत कर आकारणी करते. एवढे करूनही उद्योजकांना सुविधा कोणत्याच मिळत नाहीत. एमआयडीसी वाळूजमध्ये नोंदणीकृत उद्योजक एक हजार असले तरी या उद्योजकांवर उदरनिर्वाह करणारे आणखी एक हजार उद्योजक आहेत. मागील काही वर्षांपासून एमआयडीसी उद्योगांकडून सेवाशुल्क घेत आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर घेते. वाळूजमधील उद्योजक विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत येतात. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील राजकीय मंडळी अक्षरश: कंपन्यांच्या व्यवस्थापनावर दादागिरी करतात. कधी संगणक उचलून नेतात, तर कधी कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकतात. एक ग्रामपंचायत दोन रुपये चौरस फुटाने, तर दुसरी ग्रामपंचायत चक्क आठ रुपये चौरस फुटाने कर आकारते.अनेकदा उद्योजक प्रामाणिकपणे कर भरून मोकळे होतात. लाखो रुपये कर भरल्यानंतरही ग्रामपंचायती उद्योजकांना सुविधा कोणत्याच देत नाहीत. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये व्यवसाय करणे आता खूप अवघड होऊन बसले आहे. कारण एक उद्योग चालविण्यासाठी किती यातना सहन कराव्या लागतात हे कंपनी मालकालाच माहीत असते.