शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंच्या मोर्चाने दणाणले शहर

By admin | Updated: August 21, 2014 01:23 IST

बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या

बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये आठवले, पप्पु कागदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माळीवेस, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे येऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चामध्ये उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.यावेळी रामदास आठवले म्हणाले की, पुरेसा पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार यात शंका नाही. सत्तेवर आल्यास विधायक निर्णय घेण्यात येतील असेही आठवले म्हणाले. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन वर्ष उलटले तरी मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही. ही अतिशय निंदनीय बाब असून आमची सत्ता आल्यास आरोपी पकडू, असे आश्वासनही त्यांनी दिले. रिपाइं युवा प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे म्हणाले, पावसाअभावी पिके उगवली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी. गायरान जमिनीसंर्दभाचा जीआर वाढवून तो २०१० चा त्यात समावेश करावा असे कागदे म्हणाले. राजाभाऊ सरवदे, कांतीकुमार जैन, डॉ. विजय गोरे, मिलिंद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, अमर कसबे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची भाषणे झाली. दलितांवरील अत्याचार रोखण्यात यावेत व दलितांना संरक्षण देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेला लागु करण्यात आलेली दारिद्रय रेषेची व पीआर कार्डची अट रद्द करावी, डीआरडीएकडील घरकुल योजना समाजकल्याणकडे वर्ग करावी, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे महामंडळाला १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, एससी, ओबीसी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी आदी मागण्या झाल्या़ (प्रतिनिधी)जिल्ह्यात आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची प्रकर्षाने आठवण झाली. येथे आल्यानंतर त्यांची नेहमीच भेट व्हायची. त्यांचे अपघाती निधन मनाला चटक लावुन गेले. ते महायुतीचे शिल्पकार होते असे सांगत मुंडे यांनी मी खासदार व्हावा यासाठी आग्रही भुमिका बजावली होती, असे आठवले म्हणाले.