महागाईचा फटका, छत्रपती संभाजीनगरात सिटी बसच्या प्रवाशांना दणका; तिकीटात २० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:49 IST2025-04-16T12:48:36+5:302025-04-16T12:49:10+5:30
२०२२ सालचे दर आजपर्यंत कायम असल्याचा दावा विभागाने केला आहे; जाणून घ्या नवे तिकीट दर

महागाईचा फटका, छत्रपती संभाजीनगरात सिटी बसच्या प्रवाशांना दणका; तिकीटात २० टक्के वाढ
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन लि.ने सिटीबसच्या तिकीट दरांमध्ये १६ एप्रिलपासून २० टक्के दरवाढ केली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि स्पेअर पार्ट्सचे भाव वाढल्यामुळे दरवाढ केल्याचे स्मार्ट शहर बस विभागाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
२०१९ साली शहर बससेवा सुरू झाली. २०२२ सालचे दर आजपर्यंत कायम असल्याचा दावा विभागाने केला आहे. सध्या बस देखभाल, स्पेअर पार्ट्सचे दर वाढले आहेत. जानेवारी २०२५ पासून चालक व कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ ४० टक्के वाढ झाली आहे. याचा आर्थिक बोजा स्मार्ट सिटी बस विभागावर पडला आहे. त्यामुळे प्रवासी भाडेवाढ करण्याविना पर्याय नाही. सध्या असलेल्या तिकीट दरामध्ये २० टक्के वाढ म्हणजेच किमान प्रवास भाडे ६ रुपये असणार आहे. प्रवासी भाडे पाच रुपयांच्या पटीत न ठेवता एक रुपयाच्या पटीत ठेवले आहे. सुट्या पैशांची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
मार्ग...........................................आधीचे भाडे..............आजपासून किती भाडे ?
सिडको बसस्थानक ते रांजणगाव.......३५............................४२ रुपये
सिडको बसस्थानक ते जोगेश्वरी...........४०......................४८
सिडको बसस्थानक ते करमाड ...........४०......................४८
सिडको बसस्थानक ते फुलंब्री..............४५.......................५४
सिडको बसस्थानक ते रेल्वे स्टेशन ........२५....................३०
हर्सूल टी पॉइंट ते फुलंब्री.....................३५......................४२
मध्यवर्ती बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट......२५..............३०
स्टेशन ते बिडकीन...................३५............................४२
स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक........१५......................१७
मध्यवर्ती बसस्थानक ते वेरूळ..............५०...................६०
सिडको बसस्थानक ते बाबा पेट्रोल पंप.......२०....................२३
औरंगपुरा ते वाळूज पोलिस ठाणे..........३५.........................४२
औरंगपुरा ते नाईकनगर...................३०................................३६
औरंगपुरा ते हिंदुस्तान आवास..........३०.................................३६
सिडको बसस्थानक ते विद्यापीठ........३०...........................३६
सिडको बसस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक.........२५..............३०
मध्यवर्ती बसस्थानक ते फुलंब्री ...................४५................५४