शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नागरिकांचे हाल

By admin | Updated: August 25, 2014 00:25 IST

वाळूज महानगर : चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने जोगेश्वरीतील नागरिकांचे हाल सुरू आहेत.

वाळूज महानगर : चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने जोगेश्वरीतील नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपुऱ्या पाण्यामुळे भर पावसाळ्यातही हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना भटकंती करावी लागत आहे. स्थानिक प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. आयएसओ नामांकनाचे बिरुद लावून मिरविणारी जोगेश्वरी ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. पाणीपट्टी वसूल करणारे प्रशासन नागरिकांना महिन्यातून केवळ ८ दिवसच पाणीपुरवठा करते. एमआयडीसीचे पाणी जोगेश्वरी वसाहतीतील आंबेडकरनगर, न्यू आंबेडकरनगर, गौतमनगर भागांसह मूळ गावाला चार दिवसांआड सोडले जाते, तेही कमी दाबाने. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे अनेकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना पायपीट करावी लागते. एमआयडीसीच्या गळक्या जलवाहिनीच्या खड्ड्यातून नागरिकांना पाणी आणावे लागते. पाण्यासाठी कामधंदे सोडून कंपनीच्या गेटवर व नळावर महिलांना व लहान मुलांना तासन्तास ताटकळत राहावे लागत असल्याने अनेकांना कामाला दांडी मारावी लागते. ग्रामपंचायतीची मनमानीपाणीपट्टीच्या निकषानुसार दररोज नळाला पाणी येणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत महिन्यातून आठच दिवस पाणी देते आणि संपूर्ण महिन्याची पाणीपट्टी सक्तीने वसूल करते. हा अन्याय आहे. ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांची नियमबाह्य मनमानी सुरू आहे. त्यांच्या मनमानीमुळेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत असल्याचे प्रवीण दुबिले यांनी सांगितले.ग्रा.पं.ने सर्वांना पाणी द्यावेमीना पनाड म्हणाल्या, ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करते. मात्र, पुरेसे पाणी देत नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांना रोजगार बुडवून पाणी भरावे लागते. त्यामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. त्यांनी ती पार पाडावी. पाईपलाईनचे काम सुरूपाणीपट्टी ही वार्षिक आकारणी आहे. एमआयडीसीकडून जेवढे पाणी मिळते. तेवढे पाणी आम्ही नागरिकांना देतो. सध्या जलवाहिनीचे काम सुरूअसल्याने पाण्याची अडचण भासत आहे; परंतु काम पूर्ण होताच सुरळीत पाणी मिळेल.जोगेश्वरीचे ग्रामविकास प्रकाश तुपे अधिकारी यांनी सांगितले.