शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजनाची पर्वणी ‘ख्रिसमस कार्निव्हल’

By admin | Updated: December 19, 2014 01:00 IST

औरंगाबाद : मैदानात छान सजविलेला ख्रिसमस ट्री, टीव्हीवरील कलाकाराशी संवाद साधत स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद आपण घेत आहात, त्याचवेळी भरपूर बक्षिसांचा वर्षाव आपणावर होत आहे..

औरंगाबाद : ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर मैदानात छान सजविलेला ख्रिसमस ट्री, टीव्हीवरील कलाकाराशी संवाद साधत स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद आपण घेत आहात, त्याचवेळी भरपूर बक्षिसांचा वर्षाव आपणावर होत आहे... अशा कल्पनेने आपण नक्कीच भारावून जाऊ. मात्र, शनिवार, दि.२० डिसेंबर रोजी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे ते लोकमत आणि युनिव्हर्सल हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ख्रिसमस कार्निव्हल २०१४’च्या माध्यमातून.चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील गरवारे कंपनीजवळील युनिव्हर्सल हायस्कूलच्या मैदानात दुपारी ४ वा. मनोरंजन, धमाल, मस्तीला सुरुवात होणार आहे. प्रसिद्ध टीव्ही स्टार सावधान इंडिया फाईटस् बॅक फेम गिरीश जैन व सीआयडीमधील ओळखीचा चेहरा टीव्ही स्टार वैभवी उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यात असणार आहे. टीव्ही स्टार मनोरंजन करीत सर्वांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय मुलांसाठी आकर्षक ठरेल ते क्वॉड कॉफ्टरचे- तांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत आविष्कार. या कार्निव्हलमध्ये सूर्यप्रकाशात आणि सूर्यास्तानंतर क्वॉड कॉप्टरचे तीन प्रयोग सादर केले जातील. या तांत्रिक करामतीची थोडीशी झलक ‘थ्री इडियट’ सिनेमामध्ये दाखविण्यात आली आहे. याद्वारे टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचा रस निर्माण करण्याचा उद्देश आहे. याशिवाय नाताळचा चविष्ट केक, लज्जतदार खाद्यपदार्थ, विविध खेळ आणि बक्षीस जिंकण्याची संधी, असा फूल टू धमाल कार्यक्रम यानिमित्ताने सर्वांना अनुभवता येणार आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही या उपक्रमात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना सोबत आपल्या शाळेचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.