शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधी खर्चात चौगुले, मोटे आघाडीवर

By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद २०१३-१४ वर्षासाठी जिल्ह्यातील सर्वच आमदारांना २ कोटीपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला होता.

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद२०१३-१४ वर्षासाठी जिल्ह्यातील सर्वच आमदारांना २ कोटीपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला होता. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्वच्या सर्व म्हणजे २ कोटी २० लाख ७८ हजार खर्च केले आहेत. तर आमदार राहुल मोटे यांनीही विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी वापरला. मोटे यांचे केवळ १ हजार रुपये समर्पित झाल्याने हे दोन आमदार निधी खर्चण्याच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहेत. उस्मानाबाद : २०१३-१४ वर्षासाठी जिल्ह्यातील सर्वच आमदारांना २ कोटीपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला होता. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्वच्या सर्व म्हणजे २ कोटी २० लाख ७८ हजार खर्च केले आहेत. तर आमदार राहुल मोटे यांनीही विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी वापरला. मोटे यांचे केवळ १ हजार रुपये समर्पित झाल्याने हे दोन आमदार निधी खर्चण्याच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहेत. प्रत्येक आमदाराला दरवर्षी आमदार निधी मिळतो. या निधीतून रस्ते, समाज मंदिर, व्यायामशाळा, पाणीयोजना यासह इतर विकासकामे करता येतात. बहुतांश आमदारांचा निधी सभागृह व रस्त्यासाठी वापरला जात असला तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील पाचही आमदारांनी पाणीपुरवठा योजना, योजनेअंतर्गत सबमर्सिबल पंप बसविणे, ग्रामपंचायतींच्या विंधन विहिरीवर विद्युतपंप बसविणे आदी कामासाठीही प्राधान्याने निधी वापरल्याचे दिसून येते. आ. ज्ञानराज चौगुले यांना २०१३-१४ या वर्षासाठी २ कोटी २० लाख ७८ हजाराचा निधी प्राप्त झाला होता. यातील ६१ लाख ८४ हजाराचा निधी २०१२-१३ मधील अपूर्ण कामांसाठी त्यांनी वितरित केला. तर २०१३-१४ या वर्षात १ कोटी ५८ लाख ९४ हजार रुपये खर्चून सर्वच्या सर्व निधी विकास कामांवर खर्च केला. निधी खर्चण्यात राहुल मोटेही आघाडीवर राहिले. आ. मोटे यांना २०१३-१४ साठी २ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. २०१२-१३ मधील अपूर्ण कामासाठी ७७ लाख १६ हजाराची रक्कम खर्च केली तर २०१३-१४ मध्ये १ कोटी २२ लाख ८४ हजाराचा निधी विकास कामासाठी वितरित केला. २०१३-१४ मधील अवघे एक हजार रुपये समर्पित झाले आहेत. आ. ओम राजेनिंबाळकर यांनाही २ कोटींचा निधी २०१३-१४ साठी प्राप्त झाला होता. यातील ५४ लाख ३२ हजाराचा निधी २०१२-१३ या वर्षातील अपूर्ण कामासाठी वितरित करण्यात आला आणि २०१३-१४ या वर्षातील कामासाठी १ कोटी ४५ लाख ६८ हजाराचा निधी वितरित केला. त्यांच्या आमदार निधीतील सुमारे २ लाख १९ हजार समर्पित झाले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना २ कोटी ४४ लाख ५१ हजाराचा निधी २०१३-१४ या वर्षासाठी प्राप्त झाला होता. यातील २२ लाख ७६ हजार रुपये त्यांनी २०१२-१३ मधील अपूर्ण कामासाठी वितरित केले.तर २०१३-१४ या वर्षात १ कोटी ३७ लाख ९३ हजाराचा खर्च त्यांनी विकास कामावर केला. मात्र त्यानंतरही त्यांच्या फंडातील ८३ लाख ३० हजार रुपये समर्पित झाले आहेत. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या आमदार फंडातील ५० लाख २१ हजार रुपयेही असेच समर्पित झाले आहेत. चव्हाण यांना २०१३-१४ या वर्षासाठी २ कोटी ४७ लाख ७ हजाराचा निधी प्राप्त झाला होता. यातील ४२ लाख ६५ हजार रुपये त्यांनी २०१२-१३ मधील अपूर्ण कामांसाठी वितरित केले. तर २०१३-१४ मधील कामासाठी १ कोटी ५४ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले. विकास कामे उरकण्यासाठी जिल्हाभरात लगबग सुरूआमदार फंडातील निधी समर्पित होण्यात राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. याबाबत विचारले असता, पालकमंत्री चव्हाण यांनी पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कोट्यवधीचा अतिरिक्त निधी जिल्ह्यात आणला होता. त्यामुळे आमदार फंडातील निधी मुदतीत खर्च करता आला नाही, असे सांगितले. राणाजगजितसिंह पाटील यांनीही ग्रामविकास विभागाकडून सुमारे दहा कोटीचा अतिरिक्त निधी मिळवून विकास कामे केली. आमदार फंडातील निधीतील काही कामांना शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय मान्यता मिळाल्याने तो मार्चअखेर खर्च होऊ शकला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही या कामांसाठी आडवी आल्याचे ते म्हणाले. प्रत्येक वर्षी आमदाराला २ कोटीचा स्थानिक विकास निधी मिळतो. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करणे अपेक्षित असते. सर्वच आमदार या निधीतून विकास कामांचे नियोजन करून त्यास प्रशासकीय मान्यता घेतात. मात्र प्रत्यक्ष निधी ३१ मार्चपर्यंत खर्च न झाल्यास शिल्लक निधी शासनाकडे समर्पित होतो. मात्र या निधीतून करावयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने समर्पित झालेला निधी पुन्हा संबंधित कामासाठी जूनच्या सुमारास प्राप्त होतो.