शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विकासासाठी ‘एक अच्छा आदमी’ला निवडून द्या

By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST

औरंगाबाद : राजेंद्र दर्डा हे एक विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे, राजकारणात चांगल्या व्यक्ती असाव्यात, अशी माझी इच्छा आहे.

औरंगाबाद : ‘मी कधी कोणत्या नेत्याच्या प्रचारासाठी जात नाही. मात्र, राजेंद्र दर्डा हे एक विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे, राजकारणात चांगल्या व्यक्ती असाव्यात, अशी माझी इच्छा आहे. माझा त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. डीएमआयसीसारखा प्रकल्प त्यांनी औरंगाबादेत आणला. याद्वारे येत्या काळात १० लाख युवकांना नोकरी मिळेल. शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल. यासाठी सर्वांनी ‘एक अच्छा आदमी’ला निवडून द्या, हे अंत:करणातून सांगण्यासाठी औरंगाबादेत आलो आहे’, अशी साद अभिनेता श्रेयस तळपदे याने तमाम तरुणाईला घालताच त्यास पाठिंबा दर्शवीत युवाशक्तीने जल्लोष केला व ‘एक अच्छा आदमी’ला निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मिळवून दिलेला अधिकार म्हणजे मतदान. या अधिकाराचा पहिल्यांदाच हक्क बजावणाऱ्या तरुणाईला त्यांचे एक मत किती महत्त्वाचे आहे आणि या अधिकाराचा उपयोग करून ‘एक अच्छा आदमी’ला निवडून द्या, असे आवाहन करण्याकरिता ‘जवाँ दिलों की धडकन’ अभिनेता श्रेयस तळपदे आज शहरात आला होता. तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या अभिनेत्याने दिवसभरात विविध महाविद्यालयांत जाऊन तेथील युवक- युवतींशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत ऋषी दर्डा होते. सिडकोतील एका कॉलेजमध्ये श्रेयस तळपदेने प्रवेश करताच तरुणाईने त्यास घेरले. जल्लोषातच श्रेयसने माईक हाती घेतला आणि चाहत्यांशी थेट संवाद साधला. एरव्ही रुपेरी पडद्यावर आपण ज्या अभिनेत्याला पाहतो, तो प्रत्यक्ष आपल्यासमोर उभा आहे आणि प्रत्येकाशी संवाद साधत आहे हे पाहून अनेक जण भारावून गेले होते. मी कोणत्या पक्षाच्या, कोणत्याही नेत्याच्या प्रचाराला आलो नाही, असे स्पष्ट करीत श्रेयस म्हणाला की, राजकारणात चांगले नेते असावेत, ही सर्वांची इच्छा असते आणि राजेंद्र दर्डा यांच्या रूपात औरंगाबादला एक चांगला नेता मिळाला आहे. शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेला. शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची ताकद असणाऱ्या या नेत्याला मतदारांनी निवडून द्यावे, असा आवाज माझ्या अंत:करणातून निघाला आणि आज तोच अंत:करणातील आवाज माझ्या चाहत्यांना ऐकवण्यासाठी चित्रपटाचे सर्व शूटिंग रद्द करून येथे आलो आहे, असे सांगताच उपस्थित तरुणाईने टाळ्यांचा कडकडाट केला. तत्पूर्वी, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही मतदानाचा हक्क बजावू, अशी सामूहिक प्रतिज्ञा सर्व तरुणाईने घेतली. दुसऱ्या महाविद्यालयात श्रेयस तळपदे जेव्हा पोहोचला तेव्हा शेकडो युवकांनी जल्लोष करीत त्याचे स्वागत केले. आपल्या लाडक्या अभिनेत्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात येत होते. श्रेयस चाहत्यांकडे गुलाब फेकत होता. तो गुलाब आपणास मिळावा यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते. राजेंद्र दर्डा यांना शहराचा कायापालट करायचा आहे. त्यासाठी ते मनापासून अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. विकासाचा ध्यास घेतलेला हा ‘अच्छा आदमी’ निवडून यावा, हीच माझी इच्छा असल्याचे त्याने सांगताच तरुणाईनेही टाळ्या, शिट्या वाजवीत त्यास जोरदार पाठिंबा दर्शविला.एका महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात शेकडो युवक जमले होते. प्रत्येक जण मोबाईल कॅमेरात आपल्या आवडत्या अभिनेत्याचा फोटो काढून व्हॅटस् अ‍ॅपवर लोडही करीत होते. संपूर्ण शहर वाय-फाय करण्यात येईल, असे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले आहे. यामुळे नेटीजन्सला मोठा फायदा होणार असल्याचे श्रेयसने सांगताच.‘दर्डाजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणाही युवकांनी दिल्या.