छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाप्रमाणेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव डीजे आणि लेजर मुक्त साजरा करण्याचा निर्धार प्रशासनासह जयंती उत्सव समितीने केला. दोन पदाधिकाऱ्यांनी समन्वय बैठकीत डीजेला परवानगी देण्यावरून वाद घातला. मात्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी त्यांना धारेवर धरले. तुमच्या घरात देवांपुढे दारू पिऊन, डीजे लावून नाचता का? मग महाराजांच्या पुतळ्यासमोर, जन्मोत्सवाला हा हट्ट का, असे म्हणत झुंडशाही चालणार नाही, डीजे-लेजरला कुठल्याच प्रकारे परवानगी मिळणार नाही, असा कठोर इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी शहरातील काही नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवजन्मोत्सवात डीजेच्या परवानगीवरून वक्तव्य केले होते. सोमवारी तापडिया नाट्यमंदिरात पोलिस प्रशासनाच्यावतीने आयोजित समन्वय बैठकीतही हा मुद्दा चर्चेत आला. काहींनी अन्य जयंती उत्सवात वाजवल्या गेलेल्या डीजेंचा उल्लेख करत प्रशासनाला प्रतीप्रश्न केला. मात्र, गतवर्षी डीजेमुळे अनेकांच्या कानाला गंभीर इजा झाली. त्याचा दाखला देत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी डीजेला परवानगी देण्यास साफ नकार दिला. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून आभार मानले.
महावितरणच्या कामावर तीव्र नाराजीबैठकीला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळतायत. अनेक ठिकाणी रस्त्यावरच विजेचे खांब, डिपी आहेत. त्या हटवण्यासाठी ४० पेक्षा अधिक निवेदन दिले. दरवर्षी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सवात हा मुद्दा चर्चेत येतो. महावितरणकडून मात्र कुठलीच कारवाई होत नसल्याचे सांगत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
१९ फेब्रुवारीला ९५ मिरवणुका निघणार- पोलिस आयुक्तालय हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचे ६१ पुतळे- शिवजन्मोत्सवानिमित्त ९५ मिरवणुका, ७ मशाल रॅली निघणार- ३५ ठिकाणी स्टेजद्वारे अभिवादन- ८० ठिकाणी महाराजांचे प्रतिमा पूजन- ८ ठिकाणी शिवचरित्र पारायणाचे आयोजन- ३ पोलिस उपायुक्त, ७ सहायक पोलिस आयुक्त, २९ पोलिस निरीक्षक, १५० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षकांसह १५०० पोलिस अंमलदारांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असेल.
नागरिकांनी केल्या महत्त्वपूर्ण सूचना- सेव्हनहील, गजानन महाराज मंदिर ते सूतगिरणी चौक रस्त्यावरील अतिक्रमण काढावे.- गजानन महाराज मंदिर चौक, पुंडलिकनगर ते सिडको बसस्थानक रस्त्यावर मनमानी पद्धतीने ४० पेक्षा अधिक ठिकाणी दुभाजक उघडण्यात आले आहे. यामुळे मिरवणुकीत अडथळा होता. इतरवेळी सातत्याने अपघात घडतायत.- नारेगावमध्ये मुख्य रस्त्यावरच बंद पथदिवे, ड्रेनेजचे पाणी वाहते. त्यावर कारवाई करावी.- क्रांती चौकात महिला, तरुणींसाठी बॅरिकेटिंग करून स्वतंत्र जागा ठेवावी.- क्रांती चौक उत्सवात चोरांचा शिरकाव होतो. त्याला आळा घालावा.- ड्राय डे असतानाही होणारी दारूविक्रीला आळा घालावा. मिरवणुकीत नशेखाेर आढळल्यास तत्काळ कारवाई करावी.
पाच हजार युवतींना फेटे बांधणार१९ फेब्रुवारीला क्रांती चौकात जन्मोत्सवात सहभागी होणाऱ्या ५ हजार युवतींचा फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय, १८ फेब्रुवारीला तापडिया नाट्यमंदिरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले.
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar will celebrate a 'DJ-laser free' Shiv Jayanti. Authorities denied permission for DJs, citing past noise-related incidents. 95 processions are planned with tight security. Citizens raised concerns about encroachments and safety during celebrations.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में शिव जयंती 'डीजे-लेजर मुक्त' मनाई जाएगी। अधिकारियों ने शोर संबंधी पिछली घटनाओं का हवाला देते हुए डीजे की अनुमति से इनकार कर दिया। कड़ी सुरक्षा के साथ 95 जुलूसों की योजना है। नागरिकों ने अतिक्रमण और सुरक्षा पर चिंता जताई।