शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची 'धुळवड रणगाडा' परंपरा आजही कायम

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 2, 2026 16:50 IST

'कपडे फाड' होळीला फाटा! संभाजीनगरच्या प्रसिद्ध रणगाडा मिरवणुकीत यंदा नवा उत्साह; गुलालाच्या उधळणीत रंगणार शहर

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक जिल्ह्यात धुळवडीच्या दिवशी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. तशीच छत्रपती संभाजीनगरातील धुळवड रणगाडा मिरवणूकही तेवढीच प्रसिद्ध आहे. ही मिरवणूक स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे निजामाच्या काळापासून सुरू आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या तेवढ्याच जोश, जल्लोषात सुरू आहे. यंदा पहिल्यांदाच या मिरवणुकीत भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असलेला देखावा सादर करण्यात येत आहे.

निजामकाळात व्यायमशाळांच्या प्रमुखांनी एकत्र येत ‘धुळवड रणगाडा मिरवणूक’ काढण्याची प्रथा सुरू केली. त्यावेळी धुळवडच्या दिवशी बैलगाडीवर रंगाने भरलेला ड्रम ठेवत व तरुण वर्ग चौफेर रंगाचा मारा करीत. ही पिढ्यांपिढ्या सुरू आहे. सुमारे ९० वर्षांच्या जवळपास ही परंपरा पोहोचली आहे. आता ही परंपरा तरुणाईच्या हातात सोपविली आहे. १९८०च्या दशकापासून बैलगाडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर होतो.

कोणत्या भागातून निघतात धुळवड रणगाडेधुळवड रणगाडा मिरवणूक मंगळवारी धुळवडीच्या दिवशी सकाळी १०:३० वाजता निघणार आहे. धावणीमोहल्ला, राजाबाजार, चेलीपूरा-काचीवाडा, मुलायमची बाजार, श्रीमंत गल्ली, सराफा बाजार, भवानीनगर आदी भागांतून सुमारे ८ ते १० ट्रॅक्टर मिरवणूकीत सहभागी होतील. या ट्रॅक्टरवर पाच ते सहा ड्रम रंग ठेवण्यात येतात.

मिरवणुकीचा मार्ग कोणता ?विविध भागांतून निघालेले ट्रॅक्टर राजाबाजार संस्थान गणपती मंदिर चौकात येतात व तिथून सुरू होते मिरवणूक. राजाबाजारातून निघून शहागंज, गांधीपुतळा चौक, सराफा रोड, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, सुपारी हनुमान रोड, किराणाचावडी येथे अडीच वाजता पोहोचते. तिथे मिरवणुकीचे विसर्जन होते.

कपडे फाड होळीमुळे बदनाम झाली होती मिरवणूकमध्यंतरीच्या काळात मिरवणुकीत सहभागी झालेले एकामेकांना वॉर्निश लावत व कपडे फाडले जात होते. या प्रकारामुळे अनेक तरुण या मिरवणुकीपासून दूर झाले होते. पण, आता नवीन पिढीने जबाबदारी स्वीकारली असून, कपडे फाड होळी, वॉर्निशची प्रथा बंद करण्यात आली आहे.

श्रीकृष्णाच्या देखाव्यामुळे मिरवणुकीत पावित्र्य जपणारधुळवड रणगाडात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. मिरवणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही भगवान श्रीकृष्णाची मूर्ती गाईवासरा सोबत व बाजूला मोर अशा मूर्ती असणार आहेत.- धीरज सिद्ध, अध्यक्ष, सार्वजनिक होळी उत्सव समिती.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar's 'Dhulvad Rangada' tradition continues since pre-independence era.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's pre-independence 'Dhulvad Rangada' procession continues with fervor. Started in Nizam's era, it features color-filled tractors parading through the city. A Krishna tableau debuts this year, aiming to preserve the procession's sanctity after past issues with inappropriate behavior.
टॅग्स :Holiहोळी 2026chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर