छत्रपती संभाजीनगरात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची 'धुळवड रणगाडा' परंपरा आजही कायम

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 2, 2026 16:50 IST2026-03-02T16:48:56+5:302026-03-02T16:50:01+5:30

'कपडे फाड' होळीला फाटा! संभाजीनगरच्या प्रसिद्ध रणगाडा मिरवणुकीत यंदा नवा उत्साह; गुलालाच्या उधळणीत रंगणार शहर

Chhatrapati Sambhajinagar's Historic Pre-Independence 'Dhulwad Rangada' Procession Gets a Spiritual Touch | छत्रपती संभाजीनगरात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची 'धुळवड रणगाडा' परंपरा आजही कायम

छत्रपती संभाजीनगरात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची 'धुळवड रणगाडा' परंपरा आजही कायम

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक जिल्ह्यात धुळवडीच्या दिवशी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. तशीच छत्रपती संभाजीनगरातील धुळवड रणगाडा मिरवणूकही तेवढीच प्रसिद्ध आहे. ही मिरवणूक स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे निजामाच्या काळापासून सुरू आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या तेवढ्याच जोश, जल्लोषात सुरू आहे. यंदा पहिल्यांदाच या मिरवणुकीत भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असलेला देखावा सादर करण्यात येत आहे.

निजामकाळात व्यायमशाळांच्या प्रमुखांनी एकत्र येत ‘धुळवड रणगाडा मिरवणूक’ काढण्याची प्रथा सुरू केली. त्यावेळी धुळवडच्या दिवशी बैलगाडीवर रंगाने भरलेला ड्रम ठेवत व तरुण वर्ग चौफेर रंगाचा मारा करीत. ही पिढ्यांपिढ्या सुरू आहे. सुमारे ९० वर्षांच्या जवळपास ही परंपरा पोहोचली आहे. आता ही परंपरा तरुणाईच्या हातात सोपविली आहे. १९८०च्या दशकापासून बैलगाडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर होतो.

कोणत्या भागातून निघतात धुळवड रणगाडे
धुळवड रणगाडा मिरवणूक मंगळवारी धुळवडीच्या दिवशी सकाळी १०:३० वाजता निघणार आहे. धावणीमोहल्ला, राजाबाजार, चेलीपूरा-काचीवाडा, मुलायमची बाजार, श्रीमंत गल्ली, सराफा बाजार, भवानीनगर आदी भागांतून सुमारे ८ ते १० ट्रॅक्टर मिरवणूकीत सहभागी होतील. या ट्रॅक्टरवर पाच ते सहा ड्रम रंग ठेवण्यात येतात.

मिरवणुकीचा मार्ग कोणता ?
विविध भागांतून निघालेले ट्रॅक्टर राजाबाजार संस्थान गणपती मंदिर चौकात येतात व तिथून सुरू होते मिरवणूक. राजाबाजारातून निघून शहागंज, गांधीपुतळा चौक, सराफा रोड, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, सुपारी हनुमान रोड, किराणाचावडी येथे अडीच वाजता पोहोचते. तिथे मिरवणुकीचे विसर्जन होते.

कपडे फाड होळीमुळे बदनाम झाली होती मिरवणूक
मध्यंतरीच्या काळात मिरवणुकीत सहभागी झालेले एकामेकांना वॉर्निश लावत व कपडे फाडले जात होते. या प्रकारामुळे अनेक तरुण या मिरवणुकीपासून दूर झाले होते. पण, आता नवीन पिढीने जबाबदारी स्वीकारली असून, कपडे फाड होळी, वॉर्निशची प्रथा बंद करण्यात आली आहे.

श्रीकृष्णाच्या देखाव्यामुळे मिरवणुकीत पावित्र्य जपणार
धुळवड रणगाडात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. मिरवणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही भगवान श्रीकृष्णाची मूर्ती गाईवासरा सोबत व बाजूला मोर अशा मूर्ती असणार आहेत.
- धीरज सिद्ध, अध्यक्ष, सार्वजनिक होळी उत्सव समिती.

Web Title : छत्रपति संभाजीनगर की 'धुलवड रणगाड़ा' परंपरा स्वतंत्रता-पूर्व काल से जारी।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर की स्वतंत्रता-पूर्व 'धुलवड रणगाड़ा' जुलूस उत्साह के साथ जारी है। निज़ाम के युग में शुरू हुई, इसमें रंग से भरे ट्रैक्टर शहर में परेड करते हैं। इस साल कृष्ण झांकी की शुरुआत हुई, जिसका उद्देश्य अनुचित व्यवहार के बाद जुलूस की पवित्रता को बनाए रखना है।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar's 'Dhulvad Rangada' tradition continues since pre-independence era.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's pre-independence 'Dhulvad Rangada' procession continues with fervor. Started in Nizam's era, it features color-filled tractors parading through the city. A Krishna tableau debuts this year, aiming to preserve the procession's sanctity after past issues with inappropriate behavior.