Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: निवडणूक कर्तव्यावर गैरहजर ११९ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:44 IST2026-02-09T17:43:56+5:302026-02-09T17:44:20+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोगाच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: निवडणूक कर्तव्यावर गैरहजर ११९ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
गंगापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती होऊनही गैरहजर राहिलेल्या ११९ शिक्षक, सहशिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आयोगाच्या आदेशावरून शनिवारी रात्री गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गट शिक्षणाधिकारी अरविंद यांनी याप्रकरणी तक्रार दिली.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोगाच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. तसा पत्रव्यवहार करून संबंधित विभागप्रमुख, अधिवारी, कर्मचाऱ्यांना कळवले जाते. त्यानंतरही जबाबदारी टाळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी विजय राऊत यांनी दिला होता. मात्र, तरीही तब्बल ११९ अधिकारी, कर्मचारी ४ व ६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या अनिवार्य निवडणूक प्रशिक्षणास व निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिले.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
उमाकांत बदुरे, रमाकांत बडेवार, एस. ए. पवार, सुनीता भोपले, आजिनाथ काकडे, पप्पू लगड, राजेभाऊ मगर, सागर गुडा, देविदास भुक्कन, उपेंद्रराज देवढे, भाऊसाहेब ढवळे, एस. एस. चव्हाण, भामराज गायकवाड, अली सालम सय्यद, जयश्री चौरे, उषा जाधव, सुनीता गवते, चित्रकला भुरे, सोनाली पत्तेवार, चंद्रकांत धुपे, वंदना पारखे, मंजुषा सरवदे, अशोक देशमुख, विजय कांबळे, मीरा वाघ, अस्मा शेख, भुवनेश्वरी देसले, सुनीता खैरे, दीपाली जगदाळे, किरण गायकवाड, मालन ठेंगळ, अंबादास ढोके, लोपामुद्रा चव्हाण, वैशाली सोनवणे, संध्या दळवी, एस. एस. गिरी, मोनिका तहकीक, संगीता देशमुख, वैशाली बच्छाव, सोनाली चव्हाण, अमृता मासरे, मंदा नागरे, वंदना शिंदे, संजीवनी चिकाळे, पल्लवी आठरे, आशा बोत, गायत्री नाळके, अण्णा जगताप, सदाशिव पाटील, नीलेश भोसले, सोमनाथ चव्हाण, सुनील दाभाडे, बाबासाहेब घनवट, संदीप पाथ्रीकर, डी. व्ही. साळुंखे, रघुनाथ ठुबे, प्रमुलचंद पाटील, कैलास सोनटक्के, सचिन साळवे, एम. एम. घाडगे, दिनेश जोशी, सुनील बर्डे, ए. ए. हवाले, मच्छिंद्र सवई, रशीद लतीफ, जितेश पठाडे, संजय ऋषी, गणेश चव्हाण, मच्छिंद्र हिरडे, गणेश जाधव, राजू रावतारी, अन्सारी सालीमुद्दीन, तुषार पोहनेकर, संभाजी ढगे, प्रसाद दांडगे, धनंजय पाटील, श्रील जाॅनसुंदर जॉन, गोरखनाथ पाटील, अमोल मालकर, भागवत गायकवाड, राहुल बागड, गणेश वाघ, शिवलिंग कानडे, पोपट आगवन, बाशीरुद्दीन शेख, रवींद्र शिर्के, शरीफ शेख, अशोक जाधव, जितेंद्र जाधव, गणेश शहाणे, गणेश मोरे, आर. एस. गायकवाड, अर्षद नजीर, बाळासाहेब कुडाळे, ज्ञानदेव वाघमारे, काझी वाली उद्दीन, बाबासाहेब काळे, अनिल वाघ, बुडान सय्यद, अंकुश हिवाळे, विनोद कुरडे, मुरलीधर सोनवणे, लोचना पाटील, गजानन राठोड, शीतल धुमाळ, संतोष गायकवाड, अनिल शेळके, महेश सोनपे, अजय देशमुख, राजू तायडे, सुनीता नांद्रे, अशोक ननवरे, चरणसिंग बिघोत, एस. आर. गुट्टे, संजय मदने, गजाननसिंग ठाकूर, अकबर तडवी, विठ्ठल मांडे, रामेश्वर सरवदे.