छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद: गट आरक्षित झाल्याने दिग्गजांना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:51 IST2025-10-14T12:50:44+5:302025-10-14T12:51:46+5:30
मिनी मंत्रालयात प्रवेशाचे दरवाजे उघडले! आरक्षणामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत उतरण्याची संधी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद: गट आरक्षित झाल्याने दिग्गजांना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या निवडणुका आगामी काळात होणार असून, त्याच्या आरक्षणासाठी सोमवारी झालेल्या सोडतीत गट आरक्षित झाल्याचे अनेकांना दु:ख झाले. मात्र, होणारा खर्च वाचल्याचा आनंदही अनेकांना झाल्याचे दिसून आले. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृह खचाखच भरले होते. गट आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांना सत्तेत पुन्हा येण्याची संधी हुकली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना मिनी मंत्रालयात प्रवेशाची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ६३ गटांसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या देखरेखीत सानवी वाघ या चिमुकलीच्या हस्ते एकेक गटाची सोडत काढण्यात आली. एकेक चिठ्ठी निघताना इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढत होती. सोडत निघाल्यानंतर सभागृहात काही जणांनी आनंद व्यक्त करत सभागृह सोडले, तर काहींच्या अपेक्षांचा भंग झाल्याने त्यांचे चेहरे हिरमुसले. रोटेशनच्या ऐवजी सर्व सोडती नव्याने झाल्यामुळे काही जणांनी न्यायालयात देखील जाण्याचा इशारा यावेळी दिला. तसेच गटांतील संधी हुकणार असल्याने अनेकांनी पंचायत समितीकडे मोर्चा वळवणार असल्याचे यावेळी जाहीर केले. २०१७ साली जि. प. निवडणुका झाल्या होत्या. २०२२ साली जि. प.चा कार्यकाळ संपला. कोरोना परिस्थिती आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे जिल्हा परिषद निवडणुका लांबल्या. दिवाळीनंतर या निवडणुकांचा बार उडेल.
आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय समीकरणे सुरू होणार आहेत. २०१७ च्या तुलनेत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत नवे चेहरे मैदानात येण्याची शक्यता आहे. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, एकनाथ बंगाळे, दिनेश झांपले यांची यावेळी उपस्थिती होती.
आयोगाच्या सूचनांचे पालन...
गट, गण आरक्षण सोडत काढताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. यापुढेही आयोगाने काही सूचना दिल्या तर त्यानुसार निर्णय होईल. ज्यांना सोमवारच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप असेल, त्यांनी १६ तारखेपर्यंत हरकती दाखल कराव्यात, त्यावर सुनावणीअंती निर्णय होईल.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
कोण मैदानात... कोण बाहेर...
माजी जि. प. अध्यक्ष मीना रामराव शेळके, माजी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, केशव तायडे, माजी सभापती किशोर बलांडे, सदस्य रमेश गायकवाड यांच्या जागा आरक्षित झाल्याने त्यांचे चेहरे हिरमुसले. माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती विनोद तांबे, अविनाश गलांडे, सदस्य जितेंद्र जैस्वाल, रमेश पवार, पूनम राजपूत, पंकज ठोंबरेसह काही जणांना मैदानात उतरण्याची संधी आहे.
तालुका.................गट.......................कुणासाठी आरक्षित
सोयगाव...........फर्दापूर.......................सर्वसाधारण महिला
आमखेडा...................ओबीसी महिला
गोंदेगाव....................एस. टी. महिला
सिल्लोड............अजिंठा...................सर्वसाधारण महिला
शिवना....................ओबीसी महिला
उंडणगाव...................एस. सी. महिला
अंभई.......................ओबीसी
घाटनांद्रा....................सर्वसाधारण महिला
डोंगरगाव................सर्वसाधारण
भराडी....................सर्वसाधारण
अंधारी.....................सर्वसाधारण महिला
केऱ्हाळा................सर्वसाधारण महिला
कन्नड..............नागद................सर्वसाधारण महिला
करंजखेडा.............सर्वसाधारण
चिंचोली लिंबाजी................सर्वसाधारण
पिशोर......................सर्वसाधारण
कुंजखेडा................सर्वसाधारण महिला
हतनुर.....................सर्वसाधारण महिला
जेहूर.......................एस. टी. महिला
देवगाव रंगारी...........................सर्वसाधारण
फुलंब्री..................बाबरा..................ओबीसी
वडोद बाजार................ओबीसी
पाल.....................................सर्वसाधारण महिला
गणोरी.................................सर्वसाधारण
खुलताबाद.............बाजारसावंगी...................................सर्वसाधारण महिला
गदाना........................................सर्वसाधारण महिला
वेरूळ..................................ओबीसी
वैजापूर.......................... वाकला...................................सर्वसाधारण महिला
बोरसर............................................सर्वसाधारण
शिवूर................................ओबीसी
सवंदगाव.............................................सर्वसाधारण महिला
लासुरगाव..............................................सर्वसाधारण महिला
घायगाव.............................................ओबीसी
वांजरगाव.............................................सर्वसाधारण
महालगाव.............................................सर्वसाधारण
गंगापूर..........................सावंगी.............................................एस. सी. महिला
अंबेलोहळ............................................एस. सी.
रांजणगांव शे.पू....................................एस. सी.
वाळूज बु.................................एस. सी.
तुर्काबाद......................................ओबीसी महिला
शिल्लेगाव.......................................सर्वसाधारण महिला
नेवरगाव...........................................ओबीसी महिला
जामगाव......................................सर्वसाधारण महिला
शेंदूरवादा.......................................ओबीसी
छत्रपती संभाजीनगर............लाडसावंगी..................................सर्वसाधारण
गोलटगाव......................................ओबीसी महिला
करमाड...................................एस. सी. महिला
सावंगी.....................................ओबीसी
दौलताबाद...............................एस. सी. महिला
वडगाव कोल्हाटी उत्तर पूर्व.................ओबीसी महिला
वडगाव कोल्हाटी मध्यम पश्चिम........................सर्वसाधारण
पंढरपूर................................एस. सी. महिला
आडगाव बु. ...............................................सर्वसाधारण
पिंप्री बु. .......................................................सर्वसाधारण महिला
पैठण...................................चितेगाव...........................सर्वसाधारण
बिडकीन.......................................................सर्वसाधारण
आडूळ बु. ...............................................ओबीसी महिला
पाचोड बु. ...........................................सर्वसाधारण
दावरवाडी............................................ओबीसी महिला
ढोरकिन........................................ओबीसी महिला
पिंपळवाडी पि..................................एस. सी.
विहामांडवा.................................................सर्वसाधारण
नवगाव.................................................................सर्वसाधारण
एकूण गट : ६३ ....(महिला आरक्षित ३२)
अनुसूचित जाती (एससी) : ८ (महिला ४)
अनुसूचित जमाती (एसटी) : ३ (महिला २)
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) : १७ (महिला ९)
सर्वसाधारण : ३५ (महिला १७)