शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या जॅकवेलमध्ये अखेर गोदामाईचे पाणी! सायफन पद्धतीने पाणी घेण्याचे मिशन फत्ते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:49 IST

२७०० कोटींची नवी पाणी योजना: २० महिन्यांत जॅकवेलचे काम पूर्ण; १४ एप्रिलला नक्षत्रवाडीत पाणी पोहोचवण्याचे प्रशासनाचे लक्ष्य

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात उभारलेल्या जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात गुरुवारी सायंकाळी ४:४० वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाला यश आले. आयुक्त जी. श्रीकांत यांनी जॅकवेलमध्ये उभे राहून पाण्याचे दोन घोट प्राशन करीत गोदामाईचे आभार मानले. आता जॅकवेलमध्ये पाणी काही तास साठवून ठेवले जाईल. त्यानंतर या पाण्याचा प्रवास ३८ किमी लांब मुख्य जलवाहिनीतून शहराकडे सुरू होईल.

गुढीपाडव्याच्या शुभ मुर्हूतावर जॅकवेलमध्ये पाणी घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच न्यायालयानेही संमती दिली होती. धरणातील पाणी गुरुवारी सकाळी ११:०० वाजता सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये घेण्यात येणार होते. परंतु, किरकोळ तांत्रिक अडचण आली त्यावर मात करण्यासाठी जवळपास सहा तास लागले. सायंकाळी ४:४० वाजता जॅकवेलमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली. धरणात ३४ मीटर खोल जॅकवेलमध्ये मनपा आयुक्त उभे होते. फेसाळलेले पांढरेशुभ्र पाणी आत आल्यावर ते पाणी त्यांनी प्राशन केले. आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

जॅकवेलमध्ये साडेचार मीटरपर्यंत पाणी घेण्यात आले. शुक्रवारी आणखी काही प्रमाणात पाणी घेऊन विविध टप्प्यांवर कुठे लिकेज तर नाही, याची खात्री केली जाईल. जॅकवेलमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पाणी साठवून ठेवण्यात येईल. कुठेही लिकेज नसल्याची खात्री झाल्यावर पंपाची टेस्टिंग सुरू होईल. पंप यशस्वीपणे काम करीत असतील तर पाणी २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यात घेण्यात येईल. चार ते पाच किमी अंतरापर्यंत जलवाहिनी स्वच्छ केली जाणार असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

१४ एप्रिलला नक्षत्रवाडीत पाणीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून जायकवाडी ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. हे पाणी आणत असताना छोट्या-छोट्या त्रुटी दुरुस्त करणे, कुठे अडचण आली तर त्यावर मात करण्याचे काम अविरतपणे सुरू राहणार आहे. एप्रिल अखेरीस शहरात २०० एमएलडी पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहाटेपर्यंत अधिकारी नाथसागरावर

जॅकवेलमध्ये पाणी घेण्यापूर्वी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मनपा आयक्त जी. श्रीकांत यांच्यासह पहाटे ३:०० वाजेपर्यंत मजीप्राच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह जीव्हीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथु, खलील खान उपस्थित होते.

२० महिन्यांत जीव्हीपीआरचे यशहैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला योजनेचे काम देण्यात आले. कंपनीला काम सोडून जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर कंपनीने कामाला गती दिली. कोरोना काळात मजूर नव्हते. त्यानंतर कंपनीने काम केले. मे २०२४ मध्ये जॅकवेलच्या कामासाठी पीसीसी सुरू केले. त्यानंतर अवघ्या २० महिन्यांत जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण केला. जॅकवेलच्या कामासाठी निविदेनुसार ३६ महिन्यांचा कालावधी होता. दररोज सरासरी ३०० मजूर योजनेवर काम करीत होते.

योजनेचे महत्त्वपूर्ण टप्पे-२०१९ - १,६८० कोटी रुपयांच्या पाणी योजनेची घोषणा.-२०२० -तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन.-२०२१- जीव्हीपीआर कंपनीसोबत निविदेनुसार करार.-२०२२- जॅकवेलच्या कामाचे डिझाइन मंजूर.-२०२४- नाथसागरात सौम्य ब्लास्टिंग करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी.-२०२४- जॅकवेलच्या कामासाठी पीसीसी सुरू.-२०२६-जॅकवेलचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण.-१९ मार्च २०२६ सायंकाळी जॅकवेलमध्ये आले पाणी.

शहरवासीयांचे मनपूर्वक अभिनंदनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या सहकार्याने आज जॅकवेलमध्ये पाणी आले. शहरवासायींचेही या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी आणण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जातील.-जी. श्रीकांत, मनपा आयुक्त.

English
हिंदी सारांश
Web Title : Godavari Water Reaches Jayakwadi Jackwell: Mission Accomplished with Siphon Method

Web Summary : Jayakwadi dam's jackwell successfully received water via siphon method. Commissioner G. Srikanth celebrated by drinking the water. The water will be stored, tested for leaks, and then pumped to the city via a 38 km pipeline. Aiming to supply water by April 14th.
टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीMunicipal Corporationनगर पालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर