शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! छत्रपती संभाजीनगरजवळील तलावात दोन मित्रांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:19 IST

फुलंब्री पोलिसांकडून मृतदेह बाहेर; बायजीपुरा आणि नायगावच्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून अंत

फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर):छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नायगाव लगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (६ मार्च) सकाळी १० वाजेच्या सुमारास ही माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह तलावाबाहेर काढले.

काठावर सापडले बूट आणि मोबाईलमृतांमध्ये शेख रिहान शेख अहमद (१८, रा. बायजीपुरा) आणि इम्रान शेख इरफान शेख (१७, रा. नायगाव) यांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास हे दोघे नायगाव-गणोरी रस्त्यावरील तलावात पोहण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी दोघे घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांचे बूट आणि दोन मोबाईल आढळून आले, ज्यामुळे ते पाण्यात बुडाल्याचा संशय बळावला.

दोन तासांच्या शर्थीनंतर मृतदेह बाहेरघटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. सुमारे दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. इम्रान हा पेंटिंगचे काम करायचा, तर रिहान लाईट फिटिंगचे काम करायचा. दोन तरुण मुलांचा असा अचानक अंत झाल्याने नायगाव आणि बायजीपुरा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Swimming proves fatal: Two friends drown in Chhatrapati Sambhajinagar lake.

Web Summary : Two friends drowned in a lake near Chhatrapati Sambhajinagar while swimming. The tragic incident occurred near Naigaon. Their bodies were recovered after a search, leaving the community in sorrow. One worked as a painter, the other as a light fitter.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी