७० वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या; घरात तोंड, हातपाय खुर्चीला बांधलेला मृतदेह आढळला

By सुमित डोळे | Updated: October 5, 2023 10:34 IST2023-10-05T10:33:55+5:302023-10-05T10:34:27+5:30

छ्त्रपती संभाजीनगर हादरले; चिकटपट्टीने हातपाय खुर्चीला बांधलेला ७० वर्षीय वृद्धेचा मृतदेह आढळला

Chhatrapati Sambhajinagar shook; An old women's body was found tied to a chair with adhesive tape | ७० वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या; घरात तोंड, हातपाय खुर्चीला बांधलेला मृतदेह आढळला

७० वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या; घरात तोंड, हातपाय खुर्चीला बांधलेला मृतदेह आढळला

छत्रपती संभाजीनगर : निराला बाजार परिसरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या शारदाश्रम कॉलनीमध्ये ७० वर्षीय वृद्धेच्या हत्येने शहर हादरले आहे. अलका तळणीकर यांची बुधवारी रात्री अज्ञातांनी क्रूर हत्या केली. राहत्या घरातच खुर्चीवर कपड्याने बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. बुधवारी मध्यरात्री बारा वाजता ही घटना समोर आली. 

क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय तळणीकर या शारदाश्रम कॉलनीमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांच्या बहिणीचा मुलगा मुंबई येथे गेला होता. तर त्यांचा एक मुलगा लातूर येथे वास्तव्यास आहे. त्यांचा एक भाऊ विदेशात राहतो. सध्या तळणीकर या घरात एकट्याच राहत होत्या. पहिल्या मजल्यावर सर्व गाळे व्यावसायिक भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. बुधवारी मुंबईला गेलेल्या भाच्याने  अलका यांना रात्री वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी भाडेकरूंना पाहण्यास सांगितले. इमारतीमधील अभ्यासिकेतील विद्यार्थी व भाडेकरूंनी जाऊन बघितले असता अलका या खुर्चीवर बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांचे पाय व तोंड चिकट पट्टीने बांधलेले होते. तर हात व इतर शरीर मागे खुर्चीला कपड्याने बांधले होते. 

घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार, खुनाच्या कारणांचा शोध सुरू असून याप्रकरणी चार ते पाच संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले होते.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar shook; An old women's body was found tied to a chair with adhesive tape