छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:26 IST2025-07-04T10:22:30+5:302025-07-04T10:26:36+5:30

भरधाव कार काळा गणपती मंदिराजवळ भाविकांच्या गर्दीत घुसली अन् रक्ताचा सडा पडला

Chhatrapati Sambhajinagar shaken; Fatal accident near Kala Ganapati temple, two killed, four injured | छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : आज सकाळी सुमारे 9.15 वाजता एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात घडला. भरधाव कारने पाच जणांना उडवलं असून यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत.

प्रशांत एकनाथ मगर (वय 30, रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) हा क्रीडा संकुल, गारखेडा येथून टेनिस खेळून परतत होता. यावेळी काळा गणपती मंदिरासमोर कारवरील ( स्विफ्ट डिझायर, MH-20-HH-0746) ताबा सुटल्याने मोठा अपघात घडला. मंदिरासमोर टर्न घेताना त्याने निष्काळजीपणे, भरधाव वेगाने वाहन चालवत रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या अपघातात काळा गणपती मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय 70) गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. तर चौघे जखमी झाले.

जखमीमधील मनीषा विकास समधाने (वय 40), विकास समधाने (वय 50) दोघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रवींद्र भगवंतराव चौबे (वय 65) आणि श्रीकांत प्रभाकर राडेकर (वय 60)
यांना मिनी घाटी रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले असून, नातेवाईक त्यांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवत आहेत.

घटनेनंतर कारचालक प्रशांत मगर याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

Web Title: Chhatrapati Sambhajinagar shaken; Fatal accident near Kala Ganapati temple, two killed, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.