शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

१२ टक्के परताव्याचे आमिष; दुबई-मॉरिशसमधील कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींचा फसवणूक; मुंबई-ठाण्यातील आरोपींवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:11 IST

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; गुंतवणूक फसवणूक प्रकरणात एकाला अटक, मुख्य आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : दुबई व मॉरिशस देशात कंपनीचा विस्तार असल्याचे भासवून महिन्याला १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवत मुंबई व ठाण्यातील ठगांनी शहरातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. फसवणूक झालेल्या ११ गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे धाव घेतल्यानंतर सिडको ठाण्यात १.१२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुप्रसाद शंकर चव्हाण, सुपर्णा गुरुप्रसाद चव्हाण (दोघे रा. बाजेपार्क, विरार वेस्ट, मुंबई), विठ्ठल भागाजी तांदळे (रा. सुरेवाडी, जाधववाडी), सुधाकर शंकर खंडागळे (रा. खुलताबाद), तरुणा चव्हाण व सोनी मनचंदाणी (दोघी रा. ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. पदमा सुस्ते यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, नातेवाईक तांदळेच्या माध्यमातून सुस्ते यांचा चव्हाण दाम्पत्याशी संपर्क आला. पेमॅक्स ग्लोबल कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला १० ते १२ टक्के परतावा मिळेल, असे सांगत त्यांचा विश्वास जिंकण्यात आला. तांदळेने त्याचा साथीदार खंडागळेची व्हिक्टरी ट्रेडर्स कार्यालयात भेट घडवून दिली. वाळूजमधील नामांकित कंपन्यांतील कामगारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून नफा कमावल्याचे भासवण्यात आले. जून २०२३ मध्ये जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यात आले.

१.५ लाख परतावा देत विश्वास जिंकलासुस्ते यांनी जुलै २०२३ मध्ये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात ५ लाख रुपये गुंतवले. त्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये १.५ लाख रुपये परतावा देण्यात आला. तीन-चार महिने नियमित परतावा दिल्यानंतर आरोपींनी अचानक संपर्क तोडला. त्यानंतर भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. सुस्ते यांच्यासह सोनांत कावळे (२.५ लाख), रघुनाथ सुलताने (३ लाख), अरविंद दापूरकर (५ लाख), साहेबराव कांडेकर (५.५ लाख), मिलिंद म्हस्के (१० लाख), गुलाब श्रीमंत पवार (१२ लाख), सुदाम नागरे (१५ लाख), हरिचंद्र शेवाळे (३ लाख), रतनसिंग राजपूत (११.५ लाख), नथू कोल्हे (१० लाख), प्रकाश मानकर (३० लाख) यांनीही गुंतवणूक केली.

१३ कंपन्यांचा दावा, दुबई-मॉरिशसमध्ये विस्तारआरोपींनी पेमॅक्स ग्लोबल लिमिटेडसह एकूण १३ कंपन्या असल्याचे सांगितले, तसेच कंपनीचे मुख्य कार्यालय दुबई व मॉरिशसमध्ये असल्याचा दावा करत मोठ्या हाॅटेलमध्ये सेमीनार, प्रेझेंटेशन देत आमिष दाखवले.

फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यताचव्हाण दाम्पत्याने वाळूज व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील कामगारांना लक्ष्य केले होते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक घेतल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने सुधाकर खंडागळेला अटक केली असून सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dubai-Mauritius firm dupes investors with 12% return promise; case filed.

Web Summary : Mumbai and Thane individuals lured investors with a 12% return promise under the guise of a Dubai-Mauritius company. Hundreds were defrauded of crores. Police filed a case after 11 investors reported a ₹1.12 crore fraud.
टॅग्स :fraudधोकेबाजीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी