छत्रपती संभाजीनगर: रंगांचा सण असलेल्या होळीसाठी बाजारपेठेत धूम आहे. यंदा ग्राहकांचा कल 'इको-फ्रेंडली' उत्सवाकडे झुकल्याचे चित्र आहे. यंदा बाजारात सात्विक आणि हर्बल सेंद्रिय (ऑर्गेनिक) गुलालाला मोठी मागणी आहे. धुळवडी आधीच बाजारात रंग खरेदीत ६० लाख रुपयांची उलाढाल झाली असून, त्यातील ९० टक्के कोरडा रंग विकला गेला.
शहरवासीय रंगणार उत्तरप्रदेशाच्या रंगातयंदा भगवा, गुलाबी, पिवळा, जांभळा आणि निळा यांसह एकूण सात प्रमुख रंगांना ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे शहरवासीय यंदाही उत्तरप्रदेशातून आलेल्या रंगात रंगणार आहेत.
सुगंधीत मखमली रंगाने रंगवा चेहराआपल्या त्वचेविषयी मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांमध्ये. यामुळे अनेक महिला रंग खेळत नाहीत. मात्र, यंदा नैसर्गिकपद्धतीने तयार केलेला सुगंधीत मखमली रंग बाजारात आला आहे. यामुळे त्वचा खराब होत नाही, मुलायम रंग असल्याने लगेच चेहऱ्यावरुन निघून जातो पण सुगंध थोडा वेळ टिकून राहतो. या रंगांना विशेष मागणी आहे.
३५०० सिलेंडरने होणार रंगाची फवारणीयंदाच्या होळीचे आणखी एक आकर्षण म्हणजे 'कलर फॉग' आणि 'रंगांचे सिलेंडर'. मोठ्या इव्हेंट्स आणि सार्वजनिक सेलिब्रेशनसाठी शहरात जवळपास ३५०० सिलेंडर्सची विक्री झाली आहे. या सिलेंडर्सची किंमत त्यांच्या वजनानुसार (२ किलो, ४ किलो आणि ६ किलो) ७०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत आहे.
सात्विक रंगाला अधिक मागणी"लोकांना आता रंगांमध्ये सात्विकता हवी आहे. केमिकल रंगांपेक्षा हर्बल रंगांकडे लोकांचा कल वाढला असून, लहान मुलांसाठी मात्र अजूनही काही प्रमाणात पाणी आणि पिचकाऱ्यांचा वापर होतोय, पण मोठ्यांमध्ये 'कलर फॉग' आणि गुलालच पसंत केला जात आहे.
यंदाची होळी केवळ रंगांचीच नव्हे, तर ती निसर्गपूरक आणि सुरक्षित पद्धतीने साजरी करण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे आमच्याकडील उलाढालीच्या आकडेवारी वरुन लक्षात घेते.- प्रेमराज गुगळे
Web Summary : Chattrapati Sambhajinagar's Holi market booms with eco-friendly colors. Herbal gulal sees high demand. Color fog cylinders are popular. Aromatic velvet colors are trending. People prefer safe, natural celebrations.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में होली का बाजार पर्यावरण-अनुकूल रंगों से गुलजार है। हर्बल गुलाल की भारी मांग है। कलर फॉग सिलेंडर लोकप्रिय हैं। सुगंधित मखमली रंग चलन में हैं। लोग सुरक्षित, प्राकृतिक उत्सव पसंद करते हैं।