छत्रपती संभाजीनगर : कोविड लॉकडाऊनच्या काळात तंबाखू व पान मसाला विक्रीस मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली तत्कालीन पोलिस हवालदार यमाजी लक्ष्मण खटाणे (रा. प्लॉट क्र. ७८, रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला शुक्रवारी सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी ४ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला.
एका प्लंबरने दिलेल्या फिर्यादीनुसार, लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्याने तो एका व्यक्तीकडून तंबाखू व पान मसाल्याचे प्रत्येकी १० मोठे पुडे खरेदी करून शहरातील काही दुकानदारांना ते विकण्यासाठी दुचाकीवरून गेला. इंदिरानगर परिसरात विक्री करत असताना पुंजाबाई चौकाजवळ दोघांनी त्याला अडवले. तंबाखू विक्रीवर बंदी असताना विक्री करत असल्याचे सांगत त्याला शिवाजीनगर पोलिस चौकीत नेले. पोलिसांनी तंबाखू व पान मसाल्याचे पुडे व ४० ते ४२ हजार रुपयांची रक्कम जप्त केली. दोन वेगवेगळ्या कागदांवर सही व अंगठा घेतला.
हवालदार खटाणे याने या प्रकरणात मदत करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली. रक्कम न दिल्यास अटक करून हर्सुल कारागृहात पाठवण्याची धमकी दिली. त्यानंतर फोन करून १५ हजार रुपये घेऊन चौकीत येण्यास सांगितले. प्लंबरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून खटाणेला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याबाबत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुनावणी व आदेशएसीबीचे पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक लोकअभियोक्ता अनिल हिवराळे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. एसीबीचे निरीक्षक केशव डींडे व हवालदार बी. एच. थोरात यांनी पैरवीचे काम पाहिले.
Web Summary : A police officer was sentenced to four years in jail and fined for accepting a bribe during the Covid lockdown. He demanded money from a plumber to allow the illegal sale of tobacco and pan masala, threatening arrest if he didn't pay. The officer was caught red-handed by the Anti-Corruption Bureau.
Web Summary : कोविड लॉकडाउन के दौरान रिश्वत लेने के आरोप में एक पुलिस अधिकारी को चार साल की जेल और जुर्माना लगाया गया। उसने एक प्लंबर से तंबाकू और पान मसाले की अवैध बिक्री की अनुमति देने के लिए पैसे मांगे और भुगतान न करने पर गिरफ्तारी की धमकी दी। अधिकारी को भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने रंगे हाथों पकड़ा।