३० देशांतील अरहंत भिक्खूं छ. संभाजीनगरात येणार; भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:10 IST2026-02-23T15:09:48+5:302026-02-23T15:10:13+5:30

छत्रपती संभाजीनगरमध्ये जागतिक बौद्ध धम्म परिषद; ३० देशांतील प्रतिनिधी येणार, ७० वर्षांनंतर भारताला बहुमान जागतिक नकाशावर छ. संभाजीनगर! ३० देशांतील अरहंत भिक्खूंच्या उपस्थितीत भीम टेकडीवर 'धम्म परिषद'

Chhatrapati Sambhajinagar on the world map! 30 nations, 5 days and an Arahant monk; Know the schedule of 'Dhamma Parishad' | ३० देशांतील अरहंत भिक्खूं छ. संभाजीनगरात येणार; भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेची जय्यत तयारी

३० देशांतील अरहंत भिक्खूं छ. संभाजीनगरात येणार; भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेची जय्यत तयारी

छत्रपती संभाजीनगर : ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतात जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जात असून आपल्या शहराला हा बहुमान मिळाला आहे. ही पाच दिवसीय धम्म परिषद २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान असणार आहे. या धम्म परिषदेत भारतासह ३० देशांतील भिक्खुनी, भिक्खू व उपासक- उपासिका सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, अरंहत बौद्ध भिक्खुंचा सहवास या परिषदेत लाभणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजिका प्रा. भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी यांनी दिली.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी यांनी सांगितले की, भीमटेकडी परिसरातील विश्वशांती बुद्धविहार येथे होणाऱ्या या धम्म परिषदेची सर्व तयारी झाली आहे. ब्रह्मदेशातील रंगून येथे ६ वी धम्म संगिती झाली होती. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विपश्चनाचार्य गोयंका गुरुजी सहभागी झाले होते. त्यानंतर अनेक देशांचे कल्याण झाले. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो माणसांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन विज्ञानवादी, मानवी कल्याणाचा मार्ग दाखविला. त्या धम्मयुगाचे स्मरण म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तत्कालीन औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर शहरात या जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. 

या परिषदेत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्व पक्षांचे राजकीय नेते सहभागी होणार आहेत. या परिषदेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, ज्यामुळे बौद्ध धम्माच्या चळवळीला २०० वर्षांहून अधिक काळ गती मिळेल. यावेळी अनिलकुमार बस्ते, माणिकराव ढाकरगे, संजय डोंगरे, सुनीत दांडगे, ज्योती दांडगे, सी.पी. पाटील आदींची उपस्थिती होती.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में वैश्विक बौद्ध सम्मेलन: 30 देशों की भागीदारी

Web Summary : छत्रपति संभाजीनगर 70 वर्षों बाद एक वैश्विक बौद्ध सम्मेलन की मेजबानी कर रहा है, जिसमें 30 देशों के भिक्षु भाग लेंगे। भीमटेकड़ी में पांच दिवसीय कार्यक्रम बौद्ध शिक्षाओं और सामाजिक कल्याण पर केंद्रित है, जो डॉ. अम्बेडकर की विरासत का स्मरण कराता है। राजनीतिक नेताओं के भाग लेने की उम्मीद है, जिसका उद्देश्य बौद्ध आंदोलन को पुनर्जीवित करना है।

Web Title : Global Buddhist Conference in Chhatrapati Sambhajinagar: 30 Nations to Participate

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar hosts a global Buddhist conference after 70 years, featuring monks from 30 countries. The five-day event at Bhimtekdi focuses on Buddhist teachings and social welfare, commemorating Dr. Ambedkar's legacy. Political leaders are expected to attend, aiming to revitalize the Buddhist movement.