छत्रपती संभाजीनगर : जुना बाजार परिसरात गुरुवारी राजकीय वादातून माजी नगरसेवकाचे भाऊ तथा मालेगावच्या इस्लाम पार्टीचे नेते रफत यार खान (४५, रा. मिल कॉर्नर) यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी तब्बल ११ जणांवर हत्येच्या प्रयत्नासह अन्य विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, अन्य हल्लेखोर पसार झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दि. २० मार्च रोजी रफत खान यांचे नगरसेवक मेहराज खानचा भाऊ मिनाज खान अब्दुल जलील खान (४०, रा. सिटी चौक) याच्यासोबत वाद झाले होते. याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले. दि. २६ रोजी दुपारी रफत खान सिटी चौक पोलिस ठाण्यात गेले. ठाण्यातून निघताच काही अंतरावर त्यांच्यावर चार ते पाचजणांनी हल्ला चढवला. तक्रारीतील आरोपानुसार, मोहम्मद खान मेहराज खान याने वार करत, 'मेरे पिताजी और मिनाज चाचाने तुझे खत्म करकेही घरपे आने को बोला है', असे म्हणत डोक्यात बेसबॉल स्टीकने वार केले. इतरांनी लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी मारले. यात रफत खान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यांच्यावर गुन्हा दाखलमोहम्मद खान मेहराज खान, जहांगीर खान, ओसामा कलीम खान, साेहेल खान उर्फ लड्डू, आवेज काजी अंबड, राहिल सिद्दीकी, अहमद खान, बशीर खान, मेहराज खान, मिनाज खान, नदीम यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
या कलमांतर्गत कारवाई१०९-१ (खुनाचा प्रयत्न करणे), ११८-१ (घातक हत्यारांनी दुखापत पोहोचविणे), १९१-२,३ (दंगा करणे), ११५-२ (इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे), ३५१-२(धाकदपटशाही), १८९-२ (बेकायदेशीर जमाव जमवणे) या कलमांन्वये आरोपींवर कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल होताच अल्पवयीन मुलगा वगळता इतर पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.
Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a political feud resulted in a violent assault on Rafat Yar Khan. Eleven individuals, including a corporator, face attempted murder charges. The attack involved weapons and stemmed from a previous dispute. Police are investigating, one minor is detained.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में राजनीतिक विवाद के चलते रफत यार खान पर जानलेवा हमला हुआ। पार्षद समेत ग्यारह लोगों पर हत्या के प्रयास का आरोप लगा है। हमले में हथियारों का इस्तेमाल किया गया और यह पिछली बहस का नतीजा था। पुलिस जांच कर रही है, एक नाबालिग हिरासत में।