टंकलेखनात नापास; छ. संभाजीनगर मनपातील ९ लिपिक पदावनत, १८ जणांची वेतनवाढ रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:55 IST2026-02-19T11:50:47+5:302026-02-19T11:55:02+5:30

मागील काही वर्षांत मनपा प्रशासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक म्हणून पदोन्नती दिली होती.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News: Repeatedly failed typing test; 9 clerks of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation demoted, salary increment of 18 held back | टंकलेखनात नापास; छ. संभाजीनगर मनपातील ९ लिपिक पदावनत, १८ जणांची वेतनवाढ रोखली

टंकलेखनात नापास; छ. संभाजीनगर मनपातील ९ लिपिक पदावनत, १८ जणांची वेतनवाढ रोखली

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या ८ जणांना आयुक्त जी. श्रीकांत यांनी चक्क शिपाई, सुरक्ष रक्षक, वॉचमन, सफाई मजूर म्हणून बुधवारी पदावनत केले. १८ लिपीकांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. कारवाई केलेल्या सर्व लिपिकांची दोन वेळेस टंकलेखन परीक्षा घेण्यात आली. दोन्ही वेळेस ते नापास झाले. या निर्णयामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मागील काही वर्षांत मनपा प्रशासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक म्हणून पदोन्नती दिली होती. त्याचप्रमाणे मुळ लिपीक म्हणून रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची टंकलेखन परीक्षा घेण्यात आली होती. पहिल्या परीक्षेत बहुतांश कर्मचारी नापास झाले होते. त्यानंतर दोन महिन्यांची संधी देऊन पुन्हा परीक्षा घेण्यात आली. त्यात काही कर्मचारी नापास झाले. कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून प्रशासनाने त्यांना चार वेळेस टंकलेखन शिकण्याची संधी दिली. त्यानंतरही पाचव्यांदा ते नापास झाले. त्यामुळे माधवी पारगावकर, इरफान अहेमद, अनिल गादे, अजय दांडगे, सुनीता दुतोंडे, नारायण चव्हाण, विजय जाधव, कैलास जाधव, संतोष राठोड यांना बुधवारी पदावनत करीत चतुर्थश्रेणीत नेमणूक दिली.

१८ लिपिकांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला. त्यामध्ये अखिल खान, मोहमद अन्वरोद्दीन कुरैशी, राजू पठारे, अतुल बनकर, इसरत अली, अनिकेत पुरी, राजू सुरडकर, प्रभू चव्हाण, मो. मुसा कुरैशी, शफीक शहबाज खान, अखिल उर रहेमान, शांताराम निकम, पंढरीनाथ भोसले, कमल ठाकरे, अमित रगडे, आशिष राऊत, विलास पचलोरे, रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. जोपर्यंत हे कर्मचारी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत, तोपर्यंत वेतनवाढ रोखण्यात येईल, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

Web Title : टाइपिंग टेस्ट में फेल: नगर निगम क्लर्क पदावनत, वेतन वृद्धि रुकी

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में टाइपिंग टेस्ट में फेल होने पर आठ नगर निगम क्लर्कों को पदावनत किया गया। अठारह अन्य लोगों की वेतन वृद्धि तब तक रोक दी गई जब तक कि वे परीक्षा पास नहीं कर लेते, प्रशासन द्वारा कई अवसर दिए जाने के बावजूद।

Web Title : Typing Test Failures: Municipal Clerks Demoted, Salary Hikes Halted

Web Summary : Failing typing tests led to demotions for eight municipal clerks in Chhatrapati Sambhajinagar. Eighteen others had salary increases withheld until they pass the test, despite multiple chances provided by the administration.