शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगरची ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप; एअर ॲम्ब्युलन्सने थेट विदेशातून रुग्ण शहरात

By संतोष हिरेमठ | Updated: November 3, 2023 18:59 IST

रुग्णांना काही तासांत रुग्णालयात पोहोचणे झाले शक्य

छत्रपती संभाजीनगर : ‘लाइफ सेविंग’ उपचार आता शहरात सहज मिळत आहे. उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकरांना पुणे, मुंबई, हैदराबादला जाण्याची गरज उरलेली नाही. इतकेच काय शहरात एअर ॲम्ब्युलन्सची सेवाही आता ‘टेकऑफ’ घेत आहे. अगदी देशभरासह थेट विदेशातून रुग्ण एअर ॲम्ब्युलन्सने शहरात दाखल होत आहेत.

शहराने ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप घेतली आहे. आरोग्य सुविधांसाठी शहराने वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय सेवेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ अनेक काॅर्पोरेट रुग्णालये उभी राहिली आहेत. जानेवारी २०१६ मध्ये शहरात पहिले अवयवदान झाले. मात्र, दाता असतानाही केवळ शहरातून एअर ॲम्ब्युलन्स सेवा नसल्याने एका रुग्णाला हृदयापासून मुकावे लागले होते. या सेवेअभावी दात्याचे हृदय वाया गेले. याच वेळी एअर ॲम्ब्युलन्सचे महत्त्व समोर आले आणि ही सेवा देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. त्यातून शहरातील रुग्णांना अन्य शहरात आणि अन्य शहरातील रुग्णांना छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारासाठी वेळीच दाखल होणे शक्य होत आहे.

शारजाहहून रुग्ण सोडतीन तासात थेट शहरातशाहजाह येथे पर्यटनासाठी गेलेला तरुण पडला आणि त्यात त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला उपचारासाठी शहरात आणण्याचा निर्णय झाला. शारजाह येथे ७२ तास उपचार केल्यानंतर एअर ॲम्ब्युलन्सने तरुणाला आणण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी शहरासह मुंबईतील काहींनी प्रयत्न केले आणि शारजाहहून पुणेमार्गे एअर ॲम्ब्युलन्सने रुग्णाला बुधवारी रात्री शहरात आणण्यात आले. अवघ्या सोडतीन तासात एअर ॲम्ब्युलन्स शहरात पोहोचली.

अर्ध्या तासात लिव्हर, किडनी अर्ध्या तासात शहरातनांदेड येथील ब्रेनडेड रुग्णाची किडनी आणि लिव्हर घेऊन ८ ऑक्टोबर रोजी अवघ्या अर्ध्या तासात एअर ॲम्ब्युलन्स छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर केवळ ७ मिनिटांत विमानतळावरून रुग्णवाहिकेने हे अवयव प्रत्यारोपणासाठी बीड बायपासवरील खाजगी रुग्णालयात दाखल झाले.

वर्षभरात किमान १० उड्डाणेशहरातून पर्यटनासाठी शारजाह येथे गेलेल्या एका तरुणाला उपचारासाठी तातडीने एअर ॲम्बुलन्सने छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले. यासाठी मंदार भारदे यांचे सहकार्य मिळाले. शहरातून देशभरात आणि देशभरातून शहरात एअर ॲम्बुलन्सने रुग्णांची वाहतूक होत आहे. वर्षभरात किमान १० उड्डाणे होतात, अशी माहिती खासगी विमानसेवेचे संचालक सुबोध जाधव यांनी सांगितले.

खासगी रुग्णालये किती?- शहरात खासगी रुग्णालये- ५५०- ग्रामीण भागात तालुकास्तरावर खासगी रुग्णालये -३३३

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल