मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर

By राम शिनगारे | Updated: March 27, 2026 19:45 IST2026-03-27T19:42:46+5:302026-03-27T19:45:22+5:30

आरटीई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शाळेच्या स्थलांतरावरून सिडको परिसरात पालकांचा तीव्र संताप

Chhatrapati Sambhajinagar: Holy Angel English School Shifts 20km Without Govt Permission; RTE Students Suffer | मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर

मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर

छत्रपती संभाजीनगर : संस्था चालकाने मूळ शासकीय मान्यता असलेल्या ठिकाणाहून शाळा विनापरवानगी थेट ७ ते ८ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केली. तेथूनही मान्यता न घेताच परस्पर पुन्हा २० किलोमीटर अंतरावर शाळा स्थलांतरित करण्याचा प्रताप केला. प्रारंभी या शाळेत ‘आरटीई’अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांनाही स्थलांतरित झालेल्या ठिकाणी बसने घेऊन जाण्यात येत होते. मात्र, त्यातील अनेकांच्या पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर तेवढ्याच विद्यार्थ्यांना एका ठिकाणी व उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी शिकविण्यात येत असल्याचा प्रकार होली इंग्लिश एंजल शाळेने केला आहे.

प्राथमिक शालेय शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालानुसार होली एंजल इंग्लिश स्कूलला २००९ मध्ये शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार रेणुकानगर, गारखेडा परिसर याठिकाणी पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्ग भरणविण्यात येत होते. २०१७-१८ मध्ये शाळा मूळ ठिकाणी न भरवताच ७ ते ८ किलोमीटर अंतरावर एन-३, सिडको परिसरात भरविण्यास सुरुवात केली. त्याच वर्षीपासून ‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांचेही शाळेत प्रवेश देण्यात आलेले आहेत. मागील वर्षी २६ मे २०२५ पासून एन-३, सिडको परिसरातून शाळा गट नं.२३०, निपाणी, बीड रोड येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. या स्थलांतरास मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याचेही शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. मान्यता मिळण्यापूर्वीच स्थलांतर करण्यास आरटीईच्या पालकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तेव्हा शाळा व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थ्यांची वर्षभर मोफत ने-आण केली. मात्र, तरीही २० किलोमीटर अंतरावरील शाळेत पाल्यांना पाठविण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. याविरोधात पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेत विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची मागणी केली आहे.

पालकांना हवे समायोजन
शाळेत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या परिसरातीलच शाळेत समायोजन करण्यात यावे, अशी मागणीच पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याशिवाय सध्या शाळेत केवळ आरटीईच्या विद्यार्थ्यांनाच स्वतंत्र शिकविण्यात येत असून, शाळेतील इतर विद्यार्थी निपाणी येथे शिक्षण घेतात. त्याचा वाईट परिणाम आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या मनावर होत असल्याचा दावाही पालकांनी केला आहे.

मान्यता प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबित
एन-३, सिडको परिसरात सुरू असलेल्या शाळेची इमारत भाडेतत्त्वावर घेतलेली होती. ही इमारत खाली करण्यासाठी संबंधित घरमालकाने नोटीस दिली. त्यामुळे आता शाळा स्वत:च्या मालकीच्या जागेत आणि इमारतीमध्ये निपाणी परिसरात सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची ने-आण शाळा व्यवस्थापनाकडूनच नि:शुल्क केली जाते. त्याशिवाय ‘आरटीई’च्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आक्षेप आहेत त्यांना एन-३, सिडको परिसरातच शिक्षण देण्यात येत आहे. शाळेच्या स्थलांतराचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांच्या मान्यतेनंतर मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहे.
- मुख्याध्यापक, एंजल इंग्लिश स्कूल

मान्यतेनंतर स्थलांतर होईल
संबंधित शाळेच्या स्थलांतराला शासनाने मान्यता दिलेली आहे. ही मान्यता येण्यापूर्वी कोणालाही स्थलांतर करता येणार नाही. जर नियमबाह्य स्थलांतर झाले असेल तर शालेय शिक्षण विभाग योग्य ती कार्यवाही करील.
-जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

Web Title : अनुमोदन से पहले स्कूल स्थानांतरित; आरटीई छात्र पीड़ित, अभिभावकों का आरोप।

Web Summary : एंजल इंग्लिश स्कूल ने बिना अनुमति के दो बार स्थान बदला, जिससे आरटीई छात्र फंसे हुए हैं। अभिभावकों ने अनधिकृत स्थानांतरण का विरोध किया और स्थानीय स्कूलों में छात्रों को समायोजित करने की मांग की। स्कूल का दावा है कि यह कदम इमारत के मुद्दों के कारण है और अनुमोदन का इंतजार है।

Web Title : School Moved Before Approval; RTE Students Suffer, Alleges Parents.

Web Summary : Angel English School moved locations twice without permission, leaving RTE students stranded. Parents protest the unauthorized relocation and demand student placement in local schools. The school claims the move is due to building issues and awaits approval.