एजन्सीवर रांगा अन् साठेबाजाच्या शेडमध्ये ६९ सिलिंडर! छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:50 IST2026-03-20T13:45:46+5:302026-03-20T13:50:02+5:30

पत्र्याच्या शेडमध्ये गॅसचा काळाबाजार! रिकाम्या टाक्या भरण्यासाठी मोटार आणि वजनकाटा जप्त; शेख मुख्तारला पोलीस कोठडी

Chhatrapati Sambhajinagar Crime: 69 Gas Cylinders Illegally Stored in Residential Area Seized; One Arrested in Peer Bazar | एजन्सीवर रांगा अन् साठेबाजाच्या शेडमध्ये ६९ सिलिंडर! छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई

एजन्सीवर रांगा अन् साठेबाजाच्या शेडमध्ये ६९ सिलिंडर! छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे शहरात सिलिंडरचा तुटवडा जाणवत असताना बेकायदेशररीत्या साठा करून ठेवणाऱ्यावर अन्न पुरवठा विभागाने कारवाई करत ताब्यात घेतले. शेख मुख्तार शेख उस्मान (५२, रा. पीरबाजार, उस्मानपुरा) असे संशयिताचे नाव असून, जवाहरनगर पोलिसांनी त्याला अटक केली.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव व युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन, गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. गेल्या वीस दिवसांपासून शहरात व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिकांची गॅस एजन्सीवरवर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी प्रतीक्षा यादी वाढल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. परिस्थिती गंभीर वळणावर जात असल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. शासनाने साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक सूचना देत अन्न व नागरी पुरवठा विभागाला जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले सिलिंडर
अन्न व नागरी पुरवठा विभागाला पीरबाजारात शेख मुख्तारने सिलिंडरचा साठा करून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर अन्न धान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती खिल्लारे, सहायक निरीक्षक अतिष लोहकरे, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांच्या सहकाऱ्याने छापा टाकला. मुख्तारने नाल्याच्या कडेला उभारलेल्या पत्र्याचे शेडमध्ये व्यावसायिक ४५, तर घरगुती २४ सिलिंडर आढळले. त्याशिवाय रिकाम्या टाक्यांमध्ये गॅस भरण्यासाठी वजन काटा, मोटारदेखील मिळून आली. त्याच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७ सह कलम बीएनएस २८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे सहायक निरीक्षक अतिष लाेहकरे यांनी सांगितले.

Web Title : कालाबाजारी करने वाले ने 69 सिलेंडर जमा किए; संभाजीनगर में कार्रवाई

Web Summary : सिलेंडर की कमी के बीच, संभाजीनगर में एक कालाबाजारी करने वाले को 69 सिलेंडर जमा करने के आरोप में गिरफ्तार किया गया। खाद्य आपूर्ति विभाग ने एक शेड से सिलेंडर जब्त किए। आरोपी पर आवश्यक वस्तु अधिनियम के तहत आरोप लगाए गए हैं। पुलिस जांच जारी है।

Web Title : Black Marketer Hoards 69 Cylinders; Action Taken in Sambhajinagar

Web Summary : Amidst cylinder shortages, a black marketer in Sambhajinagar was arrested for hoarding 69 cylinders. Food Supply Department seized the cylinders from a shed. The accused faces charges under the Essential Commodities Act. Police investigation is underway.