चिकलठाणा ते वाळूज १८ किमी उड्डाणपुलाची घोषणा; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:02 IST2026-03-07T16:02:04+5:302026-03-07T16:02:47+5:30

चिकलठाणा ते वाळूज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा; अर्थसंकल्पातील घोषणेमुळे जालना रोडचे भाग्य उजळणार

Chhatrapati Sambhajinagar: CM Announces 18 KM Chikalthana-Waluj Flyover in State Budget | चिकलठाणा ते वाळूज १८ किमी उड्डाणपुलाची घोषणा; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

चिकलठाणा ते वाळूज १८ किमी उड्डाणपुलाची घोषणा; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील विमानतळ ते वाळूज एमआयडीसीपर्यंत उड्डाणपुलाचे काम दोन टप्प्यात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.

२४ एप्रिल २०२२ रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची घोषणा एनएचएआयमार्फत केली होती. त्यासाठी मनपाने एका संस्थेकडून कोट्यवधी रुपये खर्चून डीपीआर तयार करून घेतला; परंतु काही कारणास्तव रखडलेल्या या प्रकल्पाची घोषणा राज्य शासनाने केली आहे. महापालिकेच्या जाहीरनाम्याने भाजपने या प्रकल्पाचा अंतर्भाव केला होता. ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे म्हणाले, उन्नत मार्ग म्हणजेच उड्डाणपुलाची ती घोषणा आहे. येत्या काळात त्यासाठी तांत्रिक बाबींची जुळवाजुळव होईल. जालना रोडवरील वाहतूक कमी करण्याससह वाळूज आणि शेंद्रा एमआयडीसी कनेक्ट होण्यासाठी या पुलाचा मोठा वाटा असू शकेल.

किमान २ हजार कोटींचा प्रकल्प
संबंधित उड्डाणपूल बांधणीसाठी किमान २ हजार कोटींचा खर्च लागेल. पुलाची उंची, फोर लेन, सिंगल पिलर की डबल पिलर, लँडिंग, आऊटलेट याच्या डिझाइनवर सगळ्या खर्चाच्या बाबी अवलंबून आहेत. अहिल्यानगरमधील उड्डाणपुलाचा खर्च साधारणत: प्रतिकिमी ९० कोटींपर्यंत गेला आहे. त्याच धर्तीवर चिकलठाणा ते वाळूजपर्यंतच्या सुमारे १८ किमीपर्यंतच्या पुलास २ हजार कोटीचा निधी लागणे अपेक्षित आहे.

तीन वर्षांपूर्वीच्या डीपीआरमध्ये काय होते?
शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज एमआयडीसीपर्यंत २५ किमी अंतरात डबलडेकर पूल म्हणजे खाली रस्ता, वर पूल व मेट्रो असा प्रस्ताव पहिला डीपीआर होता. यात उड्डाणपूल १६ किमी चौपदरी आणि ९ किमीच्या डबलडेकर पुलाचा समावेश होता. त्यात शेंद्रा एमआयडीसी ते चिकलठाणा या चौपदरी उड्डाणपुलाची लांबी साडेसात किमी होती.

नवीन घोषणेत काय आहे?
चिकलठाणा ते क्रांती चौक मार्गे वाळूज एमआयडीसीपर्यंत १८ किमीचा चौपदरी उड्डाणपूल असू शकेल. परंतु, नवीन घोषणेत विमानतळ ते वाळूजपर्यंत उन्नत मार्ग करण्याची घोषणा आहे. यासाठी डीपीआर, खर्च याबाबी अद्याप समोर आलेल्या नाहीत.

निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचा शब्द
जालना रोडवर भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल उभारण्याचा शब्द भाजपने मनपा निवडणूक जाहीरनाम्यात दिला होता. रोडच्या उत्तर व दक्षिण या भागांची कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीने भुयारी मार्ग, उड्डाणपुलाची गरज असणार आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा शब्द भाजपने दिला होता. चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एक्सलग फ्लायओव्हर करण्यासह शेंद्रा ते वाळूज व बिडकीन ते हर्सूल निओ मेट्राेच्या सुविधेसाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजप जाहीरनाम्यात म्हटले हाेते.

Web Title : चिकलठाणा से वालूज तक 18 किमी फ्लाईओवर की घोषणा; मुख्यमंत्री का बड़ा बजट फैसला

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने चिकलठाणा-वालूज 18 किमी फ्लाईओवर परियोजना को दो चरणों में मंजूरी दी। परियोजना का उद्देश्य वालूज और शेंद्रा एमआईडीसी के बीच कनेक्टिविटी में सुधार करना, यातायात को कम करना है। अनुमानित लागत ₹2,000 करोड़ है। पिछली योजनाओं में डबल-डेकर पुल और मेट्रो लाइनें शामिल थीं। बीजेपी ने अपने घोषणापत्र में फ्लाईओवर का वादा किया था।

Web Title : Chikalthana to Waluj 18km Flyover Announced; CM's Major Budget Decision

Web Summary : Maharashtra government approves Chikalthana-Waluj 18km flyover project in two phases. The project aims to improve connectivity between Waluj and Shendra MIDC, reducing traffic. Estimated cost is ₹2,000 crore. Previous plans included double-decker bridges and metro lines. BJP promised the flyover in its manifesto.