शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूपट्टे लिलावात बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:38 IST

वाळूपट्ट्याच्या लिलावास विरोध करणा-या ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे मुद्दे तकलादू व मोघम स्वरूपाचे असून गावातील वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी ग्रामस्थ घेत नसल्याने या गावातील वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यास हरकत नसल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : वाळूपट्ट्याच्या लिलावास विरोध करणा-या ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे मुद्दे तकलादू व मोघम स्वरूपाचे असून गावातील वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी ग्रामस्थ घेत नसल्याने या गावातील वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यास हरकत नसल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा वाळूपट्ट्यांच्या लिलावास कडवा विरोध असतानाही असा अहवाल दिल्याने लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोरील अडचणी दूर झाल्या आहेत, तर दुसरीकडे गावक-यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणा-या पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातील बारा वाळूपट्ट्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार उपविभागीय अधिका-यांनी तहसीलदार व गटविकास अधिका-यांना वाळूपट्ट्यांच्या गावातील ग्रामपंचायतीचे ठराव तातडीने ग्रामसभा घेऊन सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार बारा पैकी सात ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांनी वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यास विरोध केला होता. पाच ग्रामपंचायतीने ठराव घेऊन लिलावास अनुमती दिली होती.गोदाकाठावरील वाळूपट्ट्यातील वडवाळी, वाघाडी, दादेगाव जहांगीर, नायगाव भाग एक व दोन, मायगाव, आपेगाव या ग्रामपंचायतींनी विरोध केला.पाटेगाव, हिरडपुरी, नवगाव, आवडे उंचेगाव व टाकळी अंबड या ग्रामपंचायतीने लिलाव करण्याचा ठराव मंजूर करुन सादर केला होता.वाळूपट्ट्याच्या लिलावास विरोध करणा-या ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा बोलावून नकारात्मक ठरावाची कारणे तपासून निर्णय घेण्यात यावा व अहवाल सादर करावा, असे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले होते. यानुसार उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत १ नोहेंबर रोजी या गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली.