शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट नुकसानीचे होणार चावडी वाचन

By admin | Updated: July 3, 2014 00:15 IST

सतीश जोशी , परभणी गारपिटीमुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होऊनही ५० टक्के गावांनाच भरपाई मिळाली होती.

सतीश जोशी , परभणीगारपिटीमुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होऊनही ५० टक्के गावांनाच भरपाई मिळाली होती. नुकसान झालेल्या सर्वांनाच गारपीट आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत द्या, या मागणीसाठी केलेल्या विविध पक्ष, संघटनांच्या आंदोलनाला यश मिळाले असून या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करुन चावडी वाचन केले जाणार आहे.परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास ४ लाख हेक्टरमध्ये रबीचे पीक घेतले होते. त्यापैकी जवळपास ५० टक्केच म्हणजे दीड लाख हेक्टरमधील पिकाच्या नुकसानीबद्दल शासनाने भरपाई दिली. परभणी तालुक्यामध्ये ७८ हजार हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असताना जवळपास ४० हजार हेक्टरमधील पिकाच्या नुकसानीबद्दल भरपाई मिळाली. उर्वरित ठिकाणी संपूर्णत: नुकसान झाले असताना त्यांचा समावेश या नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये केला गेला नाही. मनमानी आणि जागेवरच पंचनामे करुन या याद्या बनविल्या होत्या. पाथरीतालुक्यातील एका गावामध्ये ७५० एकर एकूण क्षेत्रफळापैकी ६५० एकरमध्ये उसाचे पीक होते. शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई पिकाच्या यादीत उसाचा समावेश नाही. असे असताना देखील महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या गावातील सर्वांनाच नुकसानीचे अनुदान दिले. या उलट शेजारच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही त्यांना एक रुपयाही भरपाई मिळालेली नाही. असे चित्र जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. परभणी तालुक्यामध्ये एका शिवेवर असलेल्या पोखर्णीला नुकसान भरपाई मिळाली. परंतु, आजुबाजूच्या बोरवंड बु., सुरपिंपरी आदी गावांचा त्यात समावेश नाही. परभणी तालुक्यात ११६ गावांपैकी केवळ ३१ गावांचा गारपीट नुकसानग्रस्त यादीमध्ये आहे. उर्वरित ८२ गावे वगळली, अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यामध्ये देता येतील. या सर्व महसूल प्रशासनाच्या अनागोंदीबद्दल विविध पक्ष, संघटनांनी आंदोलने, रस्ता रोको केला. या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये नुकसानीचा आढावा घेऊन पाच पंचासमक्ष चावडी वाचन केले जाणार आहे. आठ दिवसात अहवाल मागवून शासनाकडे पाठविला जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)निवेदन देऊनही दुर्लक्ष-विलास बाबरजिल्ह्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांना अनेक वेळा निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही. मनमानी करुन घरी बसूनच अनेक गावांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याचा आरोप कॉ. विलास बाबर यांनी लोकमतशी बोलताना केला.