औरंगाबादमध्ये चार्ली पोलीसाने जाळून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:22 IST2018-03-12T15:21:24+5:302018-03-12T15:22:26+5:30
मयुरपार्क परिसरातील पार्वती हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या २५ वर्षीय चार्ली पोलीसाने जाळुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

औरंगाबादमध्ये चार्ली पोलीसाने जाळून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद : मयुरपार्क परिसरातील पार्वती हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या २५ वर्षीय चार्ली पोलीसाने जाळुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. अनिल घुले (वय 25) असे चार्ली पोलीसाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मयूरपार्क येथील पार्वती अपार्टमेंटमध्ये अनिल आपल्या आई समवेत राहतात. आज सकाळी अचानक अनिल पेटलेल्या अवस्थेतच घराबाहेर पडले. यावेळी आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरीक जमले. नागरिकांनी ब्लॅंकेट टाकुन अनिलला आगलेलीआग विझवली. भाजलेल्या अनिलने "मी चार्ली पोलीस आहे माझ्या मित्रांना लवकर बोलवा' अशी विनवणी उपस्थित लोकांना केली. नागरीकांनी 108 च्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून रुग्णवाहीका पाठवण्याचे कळवले . मात्र बऱ्याच प्रतिक्षेनंतर ही १०८ ची रुग्णवाहिका आली नाही. शेवटी खाजगी वाहनातून अनिल यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.
सध्या अनिलवर घाटीत उपचार सुरु आहेत. आगीत ७० टक्के भाजले असल्याचे डॉक्टरांनी पोलीसांना कळवले आहे. अनिलने स्वतःस का जाळून घेतले अद्याप अस्पष्ट आहे. येत्या २१ मार्चला अनिलचे लग्न होते अशी माहीती परिसरातील नागरिकांनी दिली.