शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत दाखल करणार आरोपपत्र

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

औरंगाबाद : मुंबईतील शक्ती मिलची पुनरावृत्ती करणाऱ्या सुंदरवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी

औरंगाबाद : मुंबईतील शक्ती मिलची पुनरावृत्ती करणाऱ्या सुंदरवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी ग्रामीण पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहेत. २८ आॅगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी सुंदरवाडी शिवारातील शिवनेरी ढाब्याजवळील अंतर्गत रस्त्यावर गप्पा मारत थांबलेली असताना चार नराधमांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली. शेतात नेऊन त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संपूर्ण पोलीस दल या घटनेने हादरून गेले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन शहर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपली हद्द नसताना आरोपीच्या अटकेसाठी ग्रामीण पोलिसांना मदत केली. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कांचन चाटे, सहायक निरीक्षक महेश आंधळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले कसब पणाला लावून शेख जमील शेख हुसेन, तालीब अली (हीनानगर), शेख तय्यब (सुंदरवाडी) आणि अश्फाक हुसेन पटेल (रा. हीनानगर) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक प्रिया थोरात यांनी तपास केला.