बलात्कार केल्याचा चक्क पतीवरच आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:49 IST2019-01-30T00:49:29+5:302019-01-30T00:49:51+5:30

पत्नीची फिर्याद : सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 The charge against the rape of the husband | बलात्कार केल्याचा चक्क पतीवरच आरोप

बलात्कार केल्याचा चक्क पतीवरच आरोप

सिल्लोड (जि. औरंगाबाद ) : माहेरी आलेल्या पत्नीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग करणे पतीला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी चक्क पत्नीनेच पतीविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिल्याने सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सिल्लोड शहरात घडला.
औरंगाबाद येथील हर्सूल भागातील करीमनगरातील एका २७ वर्षीय तरुणाचे लग्न सिल्लोड येथील एका तरुणीशी झाले होते. मात्र, दोघांमध्ये घरगुती कारणाने वाद होत असत. त्यामुळे सदर तरुणी सात महिन्यांपासून सिल्लोड येथे तिच्या माहेरी राहत होती. काही दिवसांपूर्वी पती सिल्लोडला आला व त्याने पत्नीला धमकी देऊन अतिप्रसंग केला.
माझ्या इच्छेविरुद्ध पतीने माझ्यावर अतिप्रसंग केला, अशा आशयाची फिर्याद मंगळवारी सायंकाळी पत्नीने थेट सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिल्याने पोलीसही चक्रावले. शेवटी पोलिसांनी चौकशी करून रात्री भा.दं.वि. कलम ३७६, ब, ५०४, ५०६ अन्वये सदर पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुठुंबरे हे करीत आहेत. या घटनेमुळे सिल्लोड शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title:  The charge against the rape of the husband