शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मतेवर सर्व धर्मगुरूंचे विचार मंथन

By admin | Updated: December 8, 2015 00:06 IST

बीड : देशपातळीवर असहिष्णूतेचा मुद्दा गाजत असताना सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना एकत्रित करून देशाच्या अखंडता आणि ऐक्यावर एकत्रित मंथन करण्यासाठी

बीड : देशपातळीवर असहिष्णूतेचा मुद्दा गाजत असताना सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना एकत्रित करून देशाच्या अखंडता आणि ऐक्यावर एकत्रित मंथन करण्यासाठी बीडमध्ये १० डिसेंबररोजी राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जमियतुल उलेमा-ए-हिंद संघटनेच्या पुढाकारातून हे विचारमंथन घडणार आहे. मराठवाड्यातून एक लाखापेक्षा अधिक लोक या परिषदेला हजेरी लावणार असून इन्सानियत को जिंदा रखने के लिए मंचपर चर्चा होगी, असे संयोजन समितीचे सदस्य आणि माजी उपनगराध्यक्ष फारूक पटेल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. येथील बार्शी रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या बाजुला ३० एकराच्या परिसरात परिषद होणार असून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध धर्मगुरूंचे मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष हजरत मौलाना सय्यद अर्शद मदनी,हजरत मौलाना गुलाम मुहम्मद वस्तानवी, स्वामी लक्ष्मी शंकराचार्य, भंतोजी ज्ञानज्योती ताडोबा अभयराज्य, गुलजार अहमद आजमी, सिने दिग्दर्शक महेश भट्ट, माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसेपाटील, श्रीमंत कोकाटे, बिषप प्रदीप कांबळी, सुरजितसिंग खंगर, ह.भ.प. महादेव महाराज, डॉ.नामदेवशास्त्री महाराज, हजरत मौलाना नुरूल हक, यांची उपस्थिती राहणार आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मौलाना मस्तकीम अहसन आजमी हे असतील.परिषदेच्या यशस्वीतेसाठी मौलाना मोहम्मद जाकेर सिद्दीकी, मौलाना अब्दुल बाकी, अ‍ॅड. शेख शफीक, माजी न. प. उपाध्यक्ष मोईन मास्टर, न. प. उपाध्यक्ष हाजी नसीम इनामदार, शेख शफीक हाश्मी, शरद चव्हाण, बबन वडमारे, अशोक वाघमारे, संतोष जाधव, विनोद मुळूक आदी परिश्रम घेत आहेत.देशाच्या एकात्मतेसंदर्भात ही परिषद होत असल्याचे सांगत पटेल म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या मंचावरून करण्यात येणार आहे. देशात विविध धर्माचा आदर करणे, त्यांच्या संस्कृतीचा आदर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशात सध्या जातीयवादाचे वातावरण निर्माण होत आहे. काही लोक राजकीय फायदा उठविण्यासाठी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करताना दिसत आहेत. अशावेळी देशाची अखंडता आणि एकात्मतेला धोका निर्माण होऊ लागल्यामुळे सर्वांनी यासाठी एकत्रित येणे, ही काळाची गरज असल्याचेही पटेल म्हणाले. (प्रतिनिधी)