शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘जय श्रीराम’च्या जयघोषात मिरवणुका

By admin | Updated: April 16, 2016 01:36 IST

हिंगोली : शहरातील विविध भागात रामनवमीमुळे सकाळपासून राममय वातावरण झाले होते. शहरातील विविध भागात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत होते

हिंगोली : शहरातील विविध भागात रामनवमीमुळे सकाळपासून राममय वातावरण झाले होते. शहरातील विविध भागात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत होते. दिवसभर भजन, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून आले. सायंकाळी राम नामाच्या जयघोषात मिरवणुका काढण्यात आल्या.शहरातील रिसाला, कपडा गल्ली, अकोला रोड, जिजामातानगर, नारायणनगर, नाईकनगर आदीसह शहरभर रामनवमीच्या कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. त्याचबरोबर रक्तदान शिबीर व इतरही कार्यक्रम ठेवण्यात आले होते. ठिकठिकाणी रामभक्तांसाठी पाणी, फराळाचीही व्यवस्था करण्यात आली होती. रांगोळी काढून काही भागात मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. झांज पथक, लेझिम पथक व बॅण्ड पथकांनी दुपारनंतर शहर दणाणून सोडले होते. यात मुलांसह मुलींचीही पथके होती. त्याचबरोबर श्रीराम, हनुमान, राम, लक्ष्मणाच्या देखाव्यांसह त्या वेशभूषेतही अनेकजण दिसत होते. श्रीराम राज्य रामनवमी मंडळातर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात ९७ जणांनी रक्तदान केले.स्वराज्य मित्रमंडळाने भव्य रॅली काढली होती. यात अध्यक्ष बंटी राठोड, उपाध्यक्ष रुद्रा केंद्रे, शशिकांत वडकुते, विजय गडदे, ओमपाटील, राजू कांबळे, समाधान बलखंडे, नितीन खिल्लारे आदी उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)सार्वजनिक रामनवमी महोत्सव समितीतर्फे किर्तन, श्रीरामजी की अयोध्या सेना मंडळाकडून श्रीरामाचा देखावा, गांधी चौकात रामराज्य मित्र मंडळातर्फे पाणी बचतीचे संदेश देणारे फलक बसविण्यात आले होते. तसेच महेश चौकात हिंदुगर्जना मित्रमंडळातर्फे महाआरती कार्यक्रम घेण्यात आला.