शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
4
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
5
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
6
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
7
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
9
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
10
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
11
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
12
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
13
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
14
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
15
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
16
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
17
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
18
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
19
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
20
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या निर्णयाला आव्हान

By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या नगररचना सहायक संचालकांना उपसंचालकपद देण्यासंदर्भात इतिवृत्तात घुसडलेला ठराव जोरदार टीका झाल्यानंतर महापौरांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : महापालिकेच्या नगररचना सहायक संचालकांना उपसंचालकपद देण्यासंदर्भात इतिवृत्तात घुसडलेला ठराव जोरदार टीका झाल्यानंतर महापौरांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. महापौरांच्या या निर्णयाला या पदासाठी इच्छुक असलेले डी.पी. कुलकर्णी यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे या याचिकेसाठी चार नगरसेवकांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रांचा आधार घेण्यात आला आहे. महापालिकेच्या ११ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त १२ डिसेंबर २०१४ रोजीच्या सभेत मंजूर करताना सभागृहाच्या पटलावर न आलेला डी.पी. कुलकर्णी यांच्या पदोन्नतीचा ठराव घुसडण्यात आला. प्रशांत देसरडा, विजय वाघचौरे, संजय जोशी, रेणुकादास वैद्य, संजय केणेकर, समीर राजूरकर या नगरसेवकांनी हा ठराव मांडल्याचा देखावा तयार करून ठराव घुसडण्यात आला. मात्र, ही चलाखी लक्षात आल्याने ठराव घुसडण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. खा. चंद्रकांत खैरे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह सत्तारूढ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा ठराव रद्द करण्याचा निर्णय घेतला. महापौरांनी २२ डिसेंबर रोजी तहकूब सभेत इतिवृत्तात घुसडलेला ठराव क्रमांक ६६५ रद्द केला. हा ठराव ६६७ या क्रमांकाने मंजूर झाला. महापौर आणि शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाला अशोक बेहडे, समीर राजूरकर, हुशारसिंग चव्हाण आणि मीर हिदायत अली यांनी आक्षेप घेत महापौरांना पत्र लिहिले. विशेष म्हणजे चारही पत्रांचा मजकूर एकच असून ही पत्रे ठरवून महापौरांना अडचणीत आणण्यासाठी देण्यात आल्याचे दिसते.ठराव क्रमांक ६६७ रद्द करून इतिवृत्त मंजूर करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. मुळात शासनाचे पद असताना त्यासंबंधी ठराव आणणे, तो चुकीच्या पद्धतीने इतिवृत्तात घुसडणे, तो नंतर रद्द झाल्यानंतर त्यासंबंधी महापौरांना एकाच आशयाची पत्रे देणे या सर्व कृती नगरसेवकांना करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगरसेवकांच्या या पत्राचा आधार याचिकेसाठी घेण्यात आला. मुळात सभागृहात कोणतीही चर्चा न होता इतिवृत्तात घुसडलेला ठराव महापौरांनी वगळला इतकेच. मात्र, त्यावर नगरसेवकांच्या माध्यमातून बाण सोडण्यात आले. मुळात एखादा ठराव रद्द केल्यानंतर त्यासंबंधी शासनाकडे दाद मागण्याचा अधिकार असताना या प्रकरणात थेट याचिका दाखल करून महापौरांना अडचणीत आणण्याचा प्रकार झाला आहे. या प्रकरणाला महापालिकेतील शिवसेना विरुद्ध भाजप या वादाचीही किनार आहे.