शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीवरून राकाँचे पालकमंत्र्यांना आव्हान

By admin | Updated: June 24, 2014 00:31 IST

उस्मानाबाद : जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात आली आहे़

उस्मानाबाद : जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात आली आहे़ राज्यातील इतर तीन बँकांना शासनाने मदत केली असून, उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत का मिळत नाही? जिल्हा परिषदेचे व्यवहार डीसीसीपासून लांब का ठेवण्यात आले, याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने एका पत्रकान्वये दिले आहे. राज्य शासनाने नागपूर बँकेला ९२़९४ कोटी, वर्धा बँकेला १०२़५६ कोटी तर बुलडाणा जिल्हा बँकेला १२४़४ कोटी रूपये अशी एकूण ३१९़५४ कोटी रूपयांची शासकीय भागभांडवलाच्या स्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे़ तर यापूर्वी नांदेड जिल्हा बँकेला १०० कोटी, धूळे-नंदूरबार बँकेला ६० कोटी तर जालना बँकेला २० कोटी रूपये अनुदान स्वरूपात मदत केली आहे़ उस्मानाबाद जिल्हा बँकेला शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, यासाठी वारंवार मागणी करूनही सापत्न भावनेने दुर्लक्ष करण्यात आले आहे़ बँकेने स्वबळावर बँकींग परवाना मिळविला आहे़ तरीही बँकेत चलन तुटवडा कायम आहे़ त्यामुळे राज्य शासनाने इतर जिल्हा बँकांप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत करणे अपेक्षित आहे़ वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री बँकेस अर्थसहाय्य करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असताना जिल्हा बँकेला मदत का मिळत नाही, हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी काढलेल्या पत्रकात केले आहे़ तसेच नागपूर जिल्हा परिषदेची विविध खाती डीसीसी बँकेत चालू आहेत़ असे असताना उस्मानाबाद जि.प.चे व्यवहार डीसीसीपासून दूर का? याचाही खुलासा करावा, असे आवाहन करीत जनतेच्या हितासाठी जिल्हा बँक सक्षम करण्याची गरज असल्याचेही पत्रकात म्हटले आहे़मी सातत्याने पाठपुरावा केला : चव्हाणराष्ट्रवादीच्या आरोपाबाबत पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत मिळावी यासाठी खरीप हंगाम बैठकीसह कॅबिनेटमध्ये वारंवार पाठपुरावा केला आहे़ तेरणा व तुळजा भवानी या दोन साखर कारखान्याकडे बँकेचे जवळपास सव्वादोनशे कोटी रूपये कर्ज आहे़ ते वसूल करण्याबाबत शासनाकडून सांगण्यात आले आहे़ राष्ट्रवादीकडून राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करण्यात येत असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री त्यांचेच आहेत, त्यामुळे बँकेला निधी का मिळत नाही, हे त्यांनाच विचारावे़ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडेच कर्ज आहे, त्यांनी वसूल करून बँकेला द्यावे, असे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले़