शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निवारणाचे प्रशासनापुढे आव्हान

By admin | Updated: July 3, 2014 00:16 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड गत तीन वर्षापासून बीड जिल्हयात अल्प पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात १११ विहीरी तर २५७ बोअर अधिग्रहीत केले आहेत.

व्यंकटेश वैष्णव, बीडगत तीन वर्षापासून बीड जिल्हयात अल्प पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात १११ विहीरी तर २५७ बोअर अधिग्रहीत केले आहेत. शिरूर कासार, धारूर, बीड तालुक्यातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यातच २ जुलै चा दिवस उजडला तरी देखील पाऊस पडत नसल्याने पाणी टंचाई च्या गावांमध्ये वाढ होत असून टँकर मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज स्थितीत जिल्हयात १८० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर टँकरची संख्या ४०० पर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.जिल्हयातील केज व शिरूर कासार तालुक्यात पाण्याच्या टंचाईची तीव्रता जास्त आहे. आज नाही तर उद्या पाऊस पडेल या आशेवर जिल्हयातील ग्रामस्थ जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी करत नव्हते. मात्र ३ जुलै उजडला तरी पावसाचा पत्ता नसल्याने आता जमीनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खलावत असून सुरू असलेले बोअर, हातपंप अचानक बंद पडत आहेत. वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव हे तालुके वगळता इतर आठ तालुक्यात पाणी टंचाई जाणवत आहे. मंगळवारी दोन तालुक्यातील चार ते पाच गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये केज तालुक्यात दोन ते तीन तर शिरूर कासार तालुक्याती दोन गावांमध्ये मंगळवारी टँकर वाढविण्यात आले आहे. पाऊस लांबणीवर पडत असल्याने पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होत आहे. १४६ गावे तर २११ वाड्यांवर टंचाईचे सावटजिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १११ विहीरी व २५७ बोअर अधिग्रहित केलेले असून जिल्ह्यात १४६ गावे तर २११ वाड्यावर १८० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस न पडल्यास जिल्हयात बहुतांश गावांमध्ये अजूनही पाणी टंचाई तीव्र होऊ शकते. पाणी टंचाईची जास्त तीव्रता आष्टी, शिरूर कासार, धारूर व केज तालुक्यांमध्ये जाणवत आहे. यामुळे आता नागरिक पावसाची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.सर्व स्त्रोत घेतले ताब्यातजिल्हयातील ज्या-ज्या लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी साठा शिल्लक आहे. ते सर्व तलाव पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत केलेले आहेत. भविष्यात पाऊस पडला नाही तर प्रशासन पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी तयार आहे. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.